अन्य धर्मांच्या नागरिकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ असल्याचे सांगून ओवैसी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले ‘एमआयएम’चे अध्यक्ष व खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सध्या ‘घर वापसी’ ही मोहीम राबवली जात असून यावर ओवैसी यांनी हैद्राबादमधील एका कार्यक्रमात भाष्य केले आहे.
प्रत्येक मूल जन्माला येतो तेव्हा तो मुस्लिमच असतो पण मुलाचे आईवडिल त्याचा धर्म बदलतात. मुस्लिमांना ५ लाख तर ख्रिश्चनांना २ लाख रुपयांचे आमीष दाखवत धर्मांतर केले जात आहे. मुस्लिमांना फक्त ५ लाख रुपये देणे हास्यास्पद असून जगातील सगळी संपत्ती मुसलमांना दिली तरी मुस्लिम धर्मांतर करणार नाही, असे ओवैसी यावेळी म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2015 रोजी प्रकाशित
इस्लाम धर्माचा स्वीकार ही खरी ‘घर वापसी’- ओवैसी
अन्य धर्मांच्या नागरिकांनी इस्लामचा स्वीकार करणे हीच खरी ‘घर वापसी’ असल्याचे सांगून ओवैसी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

First published on: 04-01-2015 at 05:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Embracing islam will be real home coming asaduddin owaisi