Emergency Alert Service Alarm : देशभरात अनेक मोबाईल वापरकर्त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या वतीने एक अलर्ट आला. नागरिकांच्या फोनवर अचानक एक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. तसेच मोबाईलवर हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आपतकालीन अलर्ट सेवेचे चाचणी घेण्याचा असल्याचं सांगण्यात आलं.

विशेष म्हणजे अशाप्रकारच्या आपतकालीन संदेश सेवेच्या चाचणीचा अलर्ट देण्यात येणार असल्याबाबत सरकारकडून कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या अलर्टबाबत नागरिक अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. या अलर्टनंतरही केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालय किंवा पीआयबीच्या ट्विटर हँडलवरही याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
nana suryavanshi bjp
“त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी
vehicle dragging police
संतापजनक! दोन वाहतूक पोलिसांना कारच्या बोनेटवरून फरफटत नेलं; दिल्लीतील घटना
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू
rickshaw driver punched police crime against wife mother along with rickshaw driver
जनता वसाहतीत ‘रुट मार्च’ अडवून रिक्षाचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की

नेमकं काय घडलं?

सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास अनेक मोबाईलधारकांचा मोबाईल अचानक मोठ्या आवाजात वाजायला लागला. यानंतर मोबाईलच्या स्क्रिनवर एक संदेश आला. त्यात हा संदेश भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आपतकालीन संदेश सेवेचा भाग असल्याचं सांगण्यात आलं. काही सेकंद मोठ्या आवाजात अलार्म वाजल्यानंतर तोच मेसेज व्हॉईस मेल स्वरुपात ऐकू आला.

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणात…

आपतकालीन संदेशातील ओके बटनावर क्लिक केल्यावर तुम्हाला असे आपतकालीन अलर्ट हवे आहेत का असं विचारण्यात आलं. तसेच हो आणि नाही असे दोन पर्याय देण्यात आले. आधी हा अलर्ट इंग्रजीत आला आणि त्यानंतर मराठीत आला.

विशेष म्हणजे सर्व अँड्रॉईड मोबाईलवर हा संदेश आला असला, तरी अॅपल आयफोनवर असा कोणताही अलर्ट आलेला नाही.