Emergency In South Korea : दक्षिण कोरियात आणीबाणी जाहीर झाली आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती युक सुक येओल यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. उत्तर कोरियातील कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण झालेल्या संकटांमुळे आम्ही दक्षिण कोरियाचं रक्षण करु इच्छितो त्यामुळेच मी आणीबाणी जाहीर करतो आहोत असं युक सुक येओल यांनी जाहीर केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक सुक येओल यांची घोषणा नेमकी काय?

यूक सुक येओल यांनी एका टेलिव्हिजन ब्रिफिंगमध्ये हे सांगितलं की आता आमच्यासमोर मार्शल लॉ चा आधार घेण्यावाचून काहीही उपाय उरलेला नाही. मार्शल लॉ अर्थात आणीबाणी जाहीर करताना येओल यांनी कशाकशावर बंदी असेल हे मात्र अद्याप स्पष्ट केलेलं नाही. तसंच दक्षिण कोरियात आणीबाणीच्या ( Emergency In South Korea ) काळात कुठल्या नियमांची अंमलबजावणी केली जाईल हे देखील स्पष्ट केलेलं नाही. उत्तर कोरियातील कम्युनिस्ट शक्ती आणि देश विरोधी तत्त्वं संपवण्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलावं लागतं आहे. हे पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं होतं त्यामुळेच आम्ही आणीबाणीचा निर्णय घेतला आहे असं राष्ट्रपती येओल यांनी जाहीर केलं.

डेमोक्रेटिक पक्षाने दर्शवला विरोध

AFP ने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रपतींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाने त्यांच्या सदस्यांची एक तातडीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रपतींनी जी घोषणा केली त्यानंतर सरकार आता काय काय नियम लादू शकते किंवा कशावर बंदी आणली जाऊ शकते या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं आहे. दक्षिण कोरियात ही आणीबाणी ( Emergency In South Korea ) लादली गेली आहे असं विरोधी पक्षाने म्हटलं आहे.

ली जे म्युंग यांनी काय म्हटलं आहे?

दक्षिण कोरियाचे विरोधी पक्षातील नेते ली जे म्युंग यांनी म्हटलं आहे की राष्ट्रपतींनी दक्षिण कोरियात केलेली मार्शल लॉची घोषणा म्हणजेच आणीबाणीची घोषणा ( Emergency In South Korea ) ही नियमबाह्य आहे. दुसरीकडे सत्ताधीश असलेल्या पीपल्स पॉवर पार्टीचे प्रमुख हान डोंग हून यांनीही आणीबाणीचा निर्णय जाहीर करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तसंच आम्ही लवकरच हा निर्णय बदलू असंही जाहीर केलं आहे. असोसिएट प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emergency in south korea president declares martial law accusing opposition of anti state activities scj