जपानचे सम्राट अकिहितो यांनी गेल्या आठवडय़ात दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राजपद त्यागण्याची आणि निवृत्तीचे जीवन जगण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावरून जपानी लोकजीवनात सध्या तरंग उमटले आहेत. त्याविषयी..

जपानमध्ये लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार कार्यरत असले तरी देशाचा कारभार सम्राटांच्या नावाने चालवला जातो. सध्याचे सम्राट अकिहितो यांचे वय ८२ वर्षे असून त्यांना आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज्यकारभारात प्रत्यक्ष लक्ष घालणे अवघड वाटू लागले आहे. त्यांच्यावर २००३ साली प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगासाठी उपचार करण्यात आले होते, तर २०१२ साली त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली. गेल्या सोमवारी त्यांनी टीव्हीवरून भाषण करून निवृत्तीची इच्छा प्रकट केली.

Loksatta anvyarth Is there a sign of India China relations
अन्वयार्थ: भारत-चीन संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Ameesha Patel
“यांच्यानंतर बॉलीवूडचं काय होणार…”, अमीषा पटेलने ‘शेवटचे सुपरस्टार’ म्हणत घेतली ‘या’ अभिनेत्यांची नावं
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस सगळा हिशेब मांडत म्हणाले, “धनंजय मुंडे पालकमंत्री असताना ७३ कोटी…”
stalled housing projects in mumbai will be completed in phased manner says dcm eknath shinde
मुंबई बाहेर फेकले गेलेल्यांना पुन्हा मुंबईत आणणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Dhananjay Munde Beed Guardian Minister
Dhananjay Munde: “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर…”, दिल्लीमध्ये भेटीगाठी घेतल्यानंतर धनंजय मुंडे काय म्हणाले?
first generation of immigrants is mirror of social changes taking place in India
समृद्ध अडगळीचे ओझे…
Viral Photo
Viral Photo : वॉचमन म्हणून दरवाजाबाहेर उभे राहिले, लेकाने २५ वर्षांनंतर त्याच फाइव्ह स्टार हॉटेलात बापाला घातले जेवू ; Photo चर्चेत

सम्राटांच्या भाषणाचे महत्त्व..

राजकीय बाबतीत सम्राट हे केवळ राज्याचे नामधारी प्रमुख असले तरी जपानी समाजात सम्राटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. समाजावर अजूनही त्यांचा विशेष पगडा आहे. सम्राटांनी सामान्यजनांना संबोधित करणे ही जपानी जनतेसाठी दुर्मीळ संधी आहे. सम्राट अकिहितो यांनी २८ वर्षांच्या कार्यकाळात जाहीर भाषण करण्याची ही केवळ दुसरी वेळ होती. यापूर्वी त्यांनी २०११ साली जपानला त्सुनामीचा फटका बसला आणि फुकुशिमा अणुकेंद्रात स्फोट होऊन जे संकट उभे राहिले त्या वेळी राष्ट्राला संबोधित केले होते. तत्पूर्वी १९४५ साली दुसऱ्या महायुद्धातील जपानच्या पराभवाची घोषणा करण्यासाठी तत्कालीन सम्राट हिरोहितो यांनी रेडिओवरून असे भाषण केले होते. सम्राटांचा आवाज ऐकण्याची बहुसंख्य जपान्यांची ती पहिलीच वेळ होती आणि त्या वेळी अनेकांनी गुडघ्यांवर बसून त्यांना अभिवादन केले होते. सम्राट हिरोहितो यांच्या नावानेच जपानने युद्ध पुकारले होते आणि त्यांना स्मरूनच इतकी अपरिमित हानी सोसली होती.

सम्राटांची इच्छा मान्य करण्यातील अडचणी..

  • जपानच्या ‘इम्पेरियल हाऊसहोल्ड लॉ’नुसार सम्राटांनी मृत्यूपर्यंत कार्यरत असणे अपेक्षित आहे. तसेच राज्यघटनेतील तरतुदीनुसार सम्राट राज्याचा आणि जनतेच्या ऐक्याचा प्रतीक मानला जातो. अकिहितो यांना मृत्यूपूर्वी जबाबदारीतून मुक्त करायचे असेल तर संसदेला सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात बदल करावा लागेल. जपानचे पंतप्रधान शिंझो अ‍ॅबे यांनी म्हटले आहे की, त्यांचे सरकार कायदा बदलण्यास तयार आहे. पण त्यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही.
  • याशिवाय अन्ही काही बाबी वादाच्या आहेत. अकिहितो यांना कामाचा ताण झेपत नसल्याने त्यांनी आताच काही जबाबदाऱ्या युवराज नारुहितो (वय ५६) यांच्यावर सोपवलेल्या आहेत. अकिहितो यांच्यानंतर नारुहितो सम्राट बनतील. पण कायद्यानुसार केवळ पुरुषच सम्राट बनू शकतात आणि नारुहितो यांचे एकमेव अपत्य कन्या आहे. जपानी सरकार सार्वजनिक जीवनात महिला सबलीकरणावर आणि सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर देत असले तरी कायद्यात सुधारणा करून महिला सम्राटांचा मार्ग प्रशस्त करणे अद्याप त्यांनाही सोपे वाटत नाही. शिंझो अ‍ॅबे यांच्या लिबरल डेमोक्रॅटिक पक्षातील पुराणवादी गटालाही महिला सबलीकरणात काही गैर वाटत नाही. पण तीच संकल्पना सम्राटपदाबाबत राबवण्यास मात्र त्यांचा विरोध आहे.

समाजजीवनातील तरंग ..

  • या प्रश्नावरून जपानच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात तरंग उमटले आहेत. प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या कल चाचण्यांमध्ये ८५ टक्के जनतेने असे मत व्यक्त केले आहे की, सम्राट अकिहितो यांच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करता त्यांना मृत्यूपूर्वी निवृत्ती स्वीकारून आराम करू देण्यास हरकत नाही. तसेच त्यासाठी कायद्यात बदल करण्यासही हरकत नाही. तसे करणे काही फार वेगळे नाही. आजवर जपानच्या निम्मा सम्राटांनी मरणापूर्वी निवृत्ती स्वीकारून बौद्ध मठांमध्ये शांत जीवन व्यतित केले आहे. पण १९व्या शतकात सम्राटांना देवत्व बहाल केले जाऊ लागल्यापासून ही पद्धत बंद पडली होती.
  • या निमित्ताने महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नाने उचल खाल्ली आहे. पौर्वात्य जपानी समाजावर अद्याप पुरुषप्रधान संस्कृतीचाच पगडा आहे. महिलांनी बहुतांशी सर्व क्षेत्रांत आघाडी घेतली असली तरी सर्वोच्च पदावर महिला विराजमान होणे ही अद्याप संवेदनशील बाब आहे. याचा अर्थ असा नाही की जपानमध्ये महिला सम्राज्ञी कधीच नव्हत्या. आजवर आठ वेळा महिला जपानच्या सम्राज्ञी बनल्या आहेत, पण ‘इम्पेरियल हाऊसहोल्ड लॉ’नुसार केवळ पुरुषच सम्राट बनू शकतात. नवा कायदा करून या दोन्ही प्रथा बंद पडल्यास जपानच्या राजेशाहीतील तो दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा बदल ठरेल.

१५०० वर्षांची अखंड परंपरा..

ख्रिस्तपूर्व ६०० पासून आजतागायत कायम असलेले जपानचे राजघराणे जगातील एकमेव आहे. इसवीसन ५०० पासून आतापर्यंत अखंड परंपरा असल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. जपानचा पहिला सम्राट जिम्मू हा सूर्यदेवतेपासून उत्पन्न झाल्याचे मानले जाते. सध्याचे अकिहितो १२५वे सम्राट आहेत. जपानच्या शिंतो धर्मात सम्राटाला देवाचा अवतार समजले जाते. सम्राटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने कॅलेंडर (संवत्सर) जाहीर केले जाते. यापूर्वीचे सम्राट हिरोहितो १९८९ साली वारले. त्यांच्या नावाने ‘शोवा’ म्हणजे ‘तेजस्वी जपान’ संवत्सर सुरू केले. आताचे सम्राट अकिहितो वारले की त्यांच्या नावाने ‘हिसी’ (सर्वत्र शांतता) संवत्सर सुरू केले जाईल. नवे संवत्सर सुरू झाले की कालगणना शून्यावर आणून पुन्हा पहिल्यापासून सुरू केली जाते. जपानचे राज्यपद ‘क्रिसँथेमम थ्रोन’ म्हणून ओळखले जाते. क्रिसँथेमम नावाचे फूल राजपदाचे प्रतीक मानले जाते. प्रत्यक्षात या फुलाच्या आकाराचे सिंहासनही असून ते नव्या सम्राटाच्या राज्याभिषेकावेळी वापरले जाते. जपानचे राजघराणे केवळ परंपरेत रमणारे नाही. सम्राट मीजी यांनी जपानला आधुनिकतेच्या आणि औद्योगिकीकरणाच्या वाटेवर आणले. त्यांनी १८६९ पासून दरवर्षी वैज्ञानिक परिषद भरवून तिचे अध्यक्षपद भूषवले. ही वैज्ञानिक परंपरा आजही चालवली जाते. सम्राट हिरोहितो यांनी ‘हायड्रोझुआ’ या विषयावर अनेक शोधनिबंध लिहिले होते, तर सम्राट अकिहितो ‘गोबी फिश’ विषयातील तज्ज्ञ मानले जातात. १९४७ साली अमलात आलेल्या नव्या राज्यघटनेनुसार सम्राटांना देव न मानता केवळ राज्यप्रमुख मानले जाते. अकिहितो आणि नारुहितो यांनी सामान्य जीवनशैली पसंद केली. तसेच राजघराण्याऐवजी सामान्य घरातील मुलींशी विवाह केला व अधिक समाजाभिमुख भूमिका घेतली.

 

संकलन – सचिन दिवाण

Story img Loader