पीटीआय, वॉशिंग्टन : २०२४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेईन, असे विधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अध्यक्षीय निवडणूक लढण्याबाबत त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केली नसली, तरी ते सातत्याने संकेत देत आहेत. फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये ‘रिपब्लिकन हिंदू संघटने’च्या (आरएचसी) दिवाळी महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या वेळी २०० भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, हिंदू, भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपले चांगले संबंध आहेत. अमेरिकेतील हिंदू आणि भारतातील नागरिकांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा राहिला आहे.
पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारताशी संबंध सुधारण्यावर भर; दिवाळी महोत्सवात डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
२०२४ मध्ये पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यास भारतासोबतचे संबंध नव्या उंचीवर नेईन, असे विधान अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
First published on: 28-10-2022 at 00:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emphasis improving relations india if president donald trump announcement at diwali festival ysh