कोलंबो : भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.यावेळी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य, बंदर पायाभूत सुविधा, विमान वाहतूक, आरोग्य, अन्न तसेच सुरक्षा, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्र आदींबाबत सहकार्याबाबत चर्चा केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पारंपरिकपणे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.

तसेच भारत आणि श्रीलंका यांना जोडण्यासाठी सागरी सेतू बांधण्याची तयारी सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील प्रस्तावित भू-लिंक संदर्भात अभ्यास अंतिम टप्प्यात आहे, असे यावेळी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. यावेळी विक्रमसिंघे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनंदन केले. जयशंकर यांनी पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांचीही भेट घेतली आणि भारताच्या भक्कम समर्थनाचा पुनरुच्चार केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emphasis on enhancing india sri lanka bilateral cooperation amy
First published on: 21-06-2024 at 07:00 IST