पीटीआय, नवी दिल्ली : Employees insurance scam case जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशीसाठी बोलावले आहे. जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचारी वैद्यकीय विमा योजना आणि किरू जलविद्युत कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकरणांत त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समूह वैद्यकीय विमा योजनेचे कंत्राट आणि किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित २,२०० कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी असताना आपल्याला दोन फाईल मंजूर करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती, असा दावाही मलिक यांनी केला होता. विमा योजना कंत्राट प्रकरणात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआयने ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी’ आणि ‘ट्रिनिटी री- इन्शुरन्स ब्रोकर्स’ या दोन कंपन्यांविरोधात गुन्हेही दाखल केले होते. ही विमा योजना मलिक यांनी ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत मंजूर केली होती. त्यानंतर योजना रद्द करण्यात आली होती. 

Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
prakash ambedkar dawood ibrahim
Prakash Ambedkar: “शरद पवार-दाऊद इब्राहिमच्या कथित भेटीची चौकशी करा”, प्रकाश आंबेडकरांची आरोपवजा मागणी
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
Hyderabad Airport Bomb Threat
‘बॉम्ब’चा टोमणा मुलीला महागात पाडला, विमानतळावर उडाली खळबळ; मेटल डिटेक्टरच्या आवाजामुळे गोंधळात भर
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

हेही वाचा >>> Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी नवा आयोग, सर्वोच्च न्यायालयात दुरुस्ती याचिकाही दाखल करण्याचा सरकारचा निर्णय

मलिक यांचा दुसरा आरोप किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित २,२०० कोटी रुपयांच्या कामात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबतचा होता. हे कंत्राट २०१९मध्ये एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. सीबीआयने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी आणि चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्स (प्रायव्हेट) लिमिटेडचे माजी अध्यक्ष नवीन कुमार चौधरी, माजी व्यवस्थापकीय संचालक एम. एस. बाबू, माजी संचालक एम. के. मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा आणि पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या मलिक हे पुलवामा हल्ल्यासंदर्भातील गौप्यस्फोटामुळे चर्चेत आहेत. ‘‘पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली होती. मात्र, त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितले’’, असा गौप्यस्फोट त्यांनी गेल्या आठवडय़ात केला होता.

हेही वाचा >>> Naroda Case: ही कायदा-सुव्यवस्था, संविधानाची हत्या!; ‘नरोदा गाम’ दंगलप्रकरणी निकालावर शरद पवार यांची टीका

प्रकरण काय?

जम्मू-काश्मीर राज्यपालपदी असताना आपल्याला दोन फाईल मंजूर करण्यासाठी ३०० कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती, असा आरोप मलिक यांनी केला होता. विमा योजना कंत्राट प्रकरणात सीबीआयने ‘रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी’ आणि ‘ट्रिनिटी री- इन्शुरन्स ब्रोकर्स’ या दोन कंपन्यांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पाशी संबंधित २,२०० कोटी रुपयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता. 

सीबीआयने काही बाबींसंदर्भात स्पष्टीकरणासाठी आपल्याला अकबर रोडवरील गेस्ट हाऊसवर हजर राहण्याची सूचना केली आहे. मी राज्यस्थानला जात असल्याने २७ ते २९ एप्रिलदरम्यान उपलब्ध असल्याचे सीबीआयला कळवले आहे.

-सत्यपाल मलिक, माजी राज्यपाल, जम्मू-काश्मीर