सिरियात जिहाद पुकारलेल्या अतिरेक्यांवर हवाई हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या वैमानिकांच्या पथकात संयुक्त अरब अमिरातीच्या एका महिला वैमानिकाचाही समावेश आहे. मेजर मरियम अल्-मन्सुरी असे या वीरांगनेचे नाव असून ती ३५ वर्षांची आहे. अमिरातीने अधिकृतपणे मात्र ही घोषणा केलेली नाही. मरियम या लढाऊ जेट चालविणाऱ्या अमिरातीतील पहिल्या महिला वैमानिक आहेत. एफ-१६च्या वैमानिक म्हणूनही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले आहे.
८९ चालकांचे परवाने रद्द
५९६ गावांत शहरी सुविधा
रायपूर : ग्रामविकास योजनेच्या माध्यमातून छत्तीसगढ सरकार ५९६ खेडय़ांमध्ये शहरी सुविधा पुरविणार आहे. तीन ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या आणि शिक्षणात प्रगती केलेल्या तसेच मागासवर्गीयांची संख्या अधिक असलेल्या खेडय़ांची निवड या योजनेसाठी करण्यात आली आहे. राष्ट्रीय मार्गापर्यत बससेवा, एटीएम केंद्र आणि वाचनालये या सुविधांचा या योजनेत समावेश आहे.
१०९ बालजवानांची म्यानमारमध्ये मुक्तता
गाडीचे दार बंद न केल्याने घटस्फोट!
जेद्दा : गाडीचे दार बंद करण्यास नकार दिल्यावरून सौदी अरेबियात एका पतीने आपल्या पत्नीस घटस्फोट दिला आहे. सहलीवरून परतल्यावर गाडीतून उतरून आणि मुलांना घेऊन ही महिला घरात निघून गेली आणि दरवाजे बंद करण्यासाठी बोलावूनही ती न आल्याने या पतीने घटस्फोटाची मजल गाठली. सौदी अरेबियात दरवर्षी ७० हजार विवाहांची नोंदणी होते आणि १३ हजार घटस्फोट होतात.
सौदी अरेबियातील स्त्रीशक्तीचे दर्शन!
सिरियात जिहाद पुकारलेल्या अतिरेक्यांवर हवाई हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या वैमानिकांच्या पथकात संयुक्त अरब अमिरातीच्या एका महिला वैमानिकाचाही समावेश आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 26-09-2014 at 03:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Empowering women in saudi arabia