अफगाणिस्तानमध्ये तालिबानने पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. २० वर्षापूर्वी भोगलेल्या नरकयातना डोळ्यासमोर येत असल्यांने अनेक जण देश सोडून जाण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे काबुल विमानतळावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या गर्दीमुळे अनेकांना चेंगराचेंगरीत जीवही गमवावा लागला आहे. तर अनेक जीव धोक्यात टाकून विमानावर टांगून प्रवास करत आहे. यात काही जणांना वरून पडून जीवही गमवावा लागला आहे. अशात माजी रॉयल कमांडो पॉल पेन फार्थिंग यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांची पत्नी काबुलमधून सुखरुपरित्या बाहेर पडल्याची पोस्ट केली आहे. मात्र आनंद व्यक्त करत असताना त्यांनी मनातील सळही बोलून दाखवली आहे. पेन फार्थिंग माजी रॉयल मरीन कमांडो आहेत. फार्थिंग यांची पत्नी सी १७ ग्लोबमास्टस्ट सैन्य परिवहन विमानाने नॉर्वेत परतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अफगाणिस्तानातून प्रत्येक तासाला विमान उड्डाण घेत आहे. ते भरलेले असो की रिकामी असो. लोकं आता जाऊ शकत नाही. त्यांना विमानतळावर जाऊ दिलं जात नाही. कैसा घरी सुखरुप आली, पण विमान पूर्ण रिकामी होतं. मिशन संपेल मात्र काही लोकं मागे राहतील”, असं ट्वीट पेन फार्थिंग यांनी केलं आहे.

फार्थिंग यांनी फोटो शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं आहे. तिला एकटीला रिकामा विमानातून जाण्याची परवानगी कशी दिली असे प्रश्नही नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

“अफगाणिस्तानातील ती दृश्य काळीज पिळवटून टाकणारी होती”, जो बायडेन यांची भावनिक प्रतिक्रिया!

आत्तापर्यंत १८ हजार नागरिकांना केलं एअरलिफ्ट!

अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेली एअरलिफ्ट मोहीम अर्थात तिथल्या अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम ही इतिहासातल्या सर्वात कठीण एअरलिफ्ट मोहिमांपैकी एक असल्याचं बायडेन यावेी म्हणाले आहेत. अमेरिकेने गेल्या दीड महिन्यात तब्बल १८ हजार नागरिकांना अफगाणिस्तानमधून सुखरुप अमेरिकेत आणलं आहे. यामधले १३ हजार नागरिक १४ ऑगस्टनंतर सुरू झालेल्या एअरलिफ्ट मोहिमेअंतर्गत परत आणण्यात आले आहेत, अशी माहिती देखील जो बायडेन यांनी दिली.