पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दोन दिवसांनी जम्मूच्या (Jammu) दौऱ्यावर येत आहेत. ३७० कलम रद्द केल्यानंतर पंतप्रधान यांचा पहिलाच दौरा आहे. यानिमित्ताने जम्मू आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी बळकट करणाऱ्याकडे सुरक्षा रक्षकांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. असं असतांना आज पहाटे दहशतवाद्यांविरोधात (Terrorists) सुरक्षा दलाची (Security forces) चकमक झाली.

जम्मू जवळ सुंजवा छावणी भागात काही दहशतवादी लपले असून ते जम्मूमध्ये हल्ल्याची तयारी करत असल्याची प्राथमिक माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला मिळाली. तेव्हा आज पहाटे या भागात शोध माहिम सुरु करण्यात आली. तर काही जवान हे या भागात बसने पोहचत असतांना पहाटे साडेचारच्या सुमारास बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये सुरक्षा दलाचा सहाय्य्क पोलिस निरक्षिक हा अधिकारी शहीद झाला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुरक्षा दलाचे काही जवानही जखमी झाले आहेत.

“तेव्हा तात्काळ प्रतिहल्ला करत केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. हे दहशतवादी जम्मूमध्ये सुरक्षा दलांवरच मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते” अशी माहिती जम्मू काश्मिर पोलिस दलाचे प्रमुख दिलबग सिंह यांनी एनडीटीव्हीशी बोलतांना दिली.

सुंजवा छावणीनमध्ये याआधी फेब्रुवारी २०१८ मध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये अनेक जण ठार झाले होते. दरम्यान गेल्या २४ तासात दुसऱ्या एका चकमकीत बारामुल्ला इथे ‘लष्कर ए तोयबा’च्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.

Story img Loader