जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या छत्ताबल भागात शनिवार सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये  सुरु असलेली  चकमक संपली आहे. जवानांनी तीन दहशतवाद्याचा खात्मा केला असून एका नागरीकाचाही मृत्यू झाला आहे. या चकमकीत सीआरपीएफचे दोन आणि एक पोलीस जखमी झाला आहे.

सफाकदल तबेला छत्ताबल भागात दहशतवादी एका घरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी या भागाला घेराव घातला व शोध मोहिम सुरु केली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली.

अजूनही दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे. काश्मीरमध्ये मागच्या २४ तासात तीन नागरीकांची हत्या झाली आहे. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी बारामुल्ला जिल्ह्यात एका व्यक्तिची गोळी झाडून हत्या केली.

Story img Loader