दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

यापूर्वीदेखील एप्रिल महिन्यात ईडीने सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपाने आम आमदी पार्टीला लक्ष्य केलं होतं. तसेच दिल्लीमधील आपचे सरकार बरखास्त करण्याची मागणी घेऊन भाजपाने दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलन केले होते.

तर दुसरीकडे आप पक्षाने याआधी सत्येंद्र जैन निर्दोष असल्याचा दावा केला होता. “सत्येंद्र जैन हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत. न्यायालय त्यांच्यावरचा खटला रद्द करेल,” असा विश्वास आपने व्यक्त केला होता. तसेच पंजाबमधील विधानभा निवडणुकीच्या अगोदर सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक केले जाणार असल्याची मला माहिती मिळाली आहे, असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यानंतर आता ईडीने जैन यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.