रितू सरीन, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आयफोनची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ‘अ‍ॅपल’ कंपनीशी संपर्क साधल्याची माहिती पुढे आली आहे.

केजरीवाल यांचा वैयक्तिक संगणक किंवा डेस्कटॉप या स्वरुपातील कोणताही इलेक्ट्रॉनिक पुरावा ईडीकडे नाही. मात्र त्यांचे चार मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. केजरीवाल यांनी त्यांचा आयफोन बंद केला आणि पासवर्ड सांगण्याचे टाळले, असे सूत्रांनी सांगितले. ‘‘माझ्या मोबाइलमधील माहिती (डाटा) आणि चॅट यांची तपासणी करून आम आदमी पक्षाची रणनीती आणि निवडणूकपूर्व युतीच्या तपशीलाची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना जाणून घ्यायची आहे,’’ असा आरोप केजरीवाल यांनी केला होता, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. केजरीवाल यांच्या आयफोनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ईडीने अधिकृतपणे ‘अ‍ॅपल’ कंपनीशी संपर्क साधला होता, परंतु त्यातील माहिती पुनप्र्राप्त करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा >>> Electoral Bonds Data : ‘मेघा इंजीनियरिंग’ची ६० टक्के देणगी भाजपला; रोखे खरेदी केल्यानंतर सरकारी कंत्राटे

केजरीवाल यांची दररोज पाच तास चौकशी करण्यात येत आहे. मात्र त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, हा फोन त्यांच्याकडे एक वर्षांपासून आहे. २०२०-२१ मध्ये मद्यधोरण तयार करताना ते वापरत असलेला मोबाइल आता त्यांच्याकडे नाही.

दरम्यान, केजरीवाल यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याची मागणी ईडी करणार आहे, मात्र ही मागणी अमान्य झाली तर ईडी त्यांची न्यायालयीन कोठडी मागणार आहे.

मोबाइलमध्ये काय?

केजरीवाल यांच्या आयफोनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ईडीने अधिकृतपणे ‘अ‍ॅपल’ कपंनीशी संपर्क साधला होता, परंतु त्यातील माहिती पुनप्र्राप्त करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

दिल्ली सरकारमधील मंत्री गहलोत यांची चौकशी

मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री आणि ‘आप’चे नेते कैलाश गहलोत यांची शनिवारी ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. या प्रकरणात चौकशीसाठी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यान्वये (पीएमएलए) जबाब नोंदवण्यासाठी त्यांना ईडीपुढे हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile zws