भारत-नेपाळ सीमेवर एकोणीस वर्षांचा एक भारतीय तरूण नाकाबंदी आंदोलन मोडून काढण्यासाठी नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याची अमेरिकेनेही दखल घेतली आहे. नेपाळमधील परिस्थितीवर आमचे लक्ष असून लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवावेत असा सल्ला अमेरिकेने नेपाळला दिला.
बिहारमधील रक्सोल येथील आशिषराम हा गोळीबारात ठार झाला, त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया एलिझाबेथ त्रुडो यांनी सांगितले.
नेपाळ-भारत सीमेवर जो हिंसाचार झाला त्याची आम्हाला माहिती आहे व नेपाळने लोकशाही व अहिंसेच्या मार्गाने प्रश्न सोडवावेत. नेपाळी सुरक्षा दलांनी संयम पाळणे गरजेचे आहे. राज्यघटनेत सर्वाना व्यापक प्रतिनिधित्व मिळेल असे त्या म्हणाल्या, आशिष राम याचा नवीन राज्यघटनेविरोधातील निदर्शनांच्या वेळी पोलिस गोळीबारात मृत्यू झाला होता. मधेशी लोक भारतीय वंशाचे असून ते नेपाळमधील तराई भागात रातात रक्सौल येथे ते व्यापारी नाक्यावर आंदोलन करीत असल्याने नेपाळमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा थांबला होता.त्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.
संघराज्यातील प्रांतांच्या सीमांची फेरआखणी, जादा प्रतिनिधित्व अशा त्यांच्या मागण्या असून आताच्या निषेधात मरण पावलेल्यांना हुतात्म्याचा दर्जा, जखमींवर मोफत उपचार अशा अनेक अटी घालण्यात आल्या आाहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा