इंग्रजी माध्यमातून घेतलेले शिक्षण हे मुलांना माणुसकी आणि राष्ट्रभक्तीचे धडे शिकवू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. भागवत यांच्या विधानामुळे आता नवा वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
स्वयंसेवक संघाचे संस्थापक के.बी.हेडगेवार यांच्या पुतळ्याच्या उद्धघटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना मोहन भागवत यांनी इंग्रजी शाळांची आपल्याला गरज नसल्याचे म्हटले. इंग्रजी शिक्षण हे केवळ आपल्या रोजीरोटीची व्यवस्था करू शकते, हे शब्द स्वामी विवेकानंदांचेच आहेत. एक चांगला माणून म्हणून इतरांची सेवा करण्याचे शिक्षण देतील, अशा शाळा हव्यात, असेही भागवत पुढे म्हणाले.
वीर सावरकर यांच्याही वाक्यांचा दाखला भागवत यांनी यावेळी दिला. समाजातील सुधारणेसाठी आपल्या शिक्षणाचा काही उपयोग होत नसेल, तर शिक्षण व्यर्थ आहे, असं सावकर म्हणायचे म्हणून देशाचं काहीतरी चांगलं करू शकू, असं शिक्षण घ्यावं, असे भागवत म्हणाले.