पुढील काळात आशियामध्ये अमेरिकी फौजांशी संपर्क प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने आपल्या दलात इंग्रजी बोलू शकणाऱ्या सैनिकांचा (थर्ड पार्टी) समावेश केला आहे.
सरहद्दीच्या मुद्दय़ावरून शेजारी राष्ट्रांसमवेत चिनी लष्कराचा तणाव निर्माण झाला आणि त्यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तर त्यास तोंड देण्याच्या हेतूने  इंग्रजी बोलू शकणाऱ्या ‘थर्ड पार्टी’चा समावेश ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ करीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या कवायतींच्या वेळी हजर असलेल्या सैनिकांमध्ये इंग्रजीची देवाणघेवाण झाल्याचे समजते.

Story img Loader