लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांची पडताळणी करताना एकही हिंदू मतदार याद्यांच्या बाहेर राहणार नाही, याची काळजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घ्यावी, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मतदार याद्यांची पडताळणी करताना हिंदू धर्मीयांचीही वेगळी यादी करण्याची गरज आहे. मात्र तसे होत नाही. संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू धर्मीयांचे नाव यादीतून गाळले जाणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे भागवत यांनी सांगितले. संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनीही भागवत यांच्या मताशी सहमती दर्शवली आहे. संघाचे स्वयंसेवक हे काम नक्की करतील, अशी खात्रीही त्यांनी दिली. निवडणूक काळात हिंदू धर्मीयांना अन्य धर्मीयांकडून कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आरएसएस घेणार आहे, असेही भागवत म्हणाले. या महिन्यात गाझियाबादला संघाची तीनदिवसीय बैठक होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा