भारताच्या शेजारीच दहशतवादाचा गड असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या संसदेत केल्यानंतर अमेरिकेनेही पाकला दम भरला आहे. आपल्या भूमीत भारताविरोधात दहशतवादी कारवायांसाठी कोणताही कट शिजला जाणार नाही, याची काळजी पाकिस्तानने घ्यायला हवी आणि तशी हमी देखील त्यांनी द्यावी, असा दम अमेरिकेने पाकला भरला आहे. अमेरिकेची ही भूमिका म्हणजे पाकिस्तानला भारतासोबतचे संबंध सुधारण्यासाठीची महत्त्वाची संधी आहे, असे अमेरिकेचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान हे परस्पर सहकार्यासाठी थेट संवाद साधून, आपापसातील तणाव दूर करण्यासाठी एकत्र येतील, असा आम्हाला विश्वास आहे. पण त्यासाठी पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर भारताविरोधात दहशतवादी कारवायांचे कट शिजणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी. दहशतवादी गटांना प्रतिबंध करायला हवा, असेही ते पुढे म्हणाले. याशिवाय, दहशतवादाचे प्रशिक्षण देणाऱया अनेक संघटना पाकिस्तानात असल्याचे मत टोनर यांनी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा