पीटीआय, संभल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलमध्ये बाहेरून जाणाऱ्यांना असलेली प्रवेशबंदी १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. याच निर्णयाच्या आधारे समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार हरेंद्र मलिक यांच्यासह पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आले.

प्रशासनाने यापूर्वी बाहेरील लोकांना लागू केलेली प्रवेशबंदी शनिवारी संपली. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे लोकप्रतिनिधी संभलला भेट देण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना अडवण्यात आले. पक्षाचे संभलचे खासदार हरेंद्र मलिक गाझियाबादमधून येत होते, त्यांनाही जिल्ह्यात प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा >>>VIDEO : दिल्लीत अरविंद केजरीवालांवर हल्ला! आपचे मंत्री म्हणाले, “अंगावर स्पिरीट फेकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न”

संभलमधील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावरून उसळलेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी १५ सदस्यीय शिष्टमंडळ भेट देईल असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले होते. या हिंसाचारात चार युवकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, संभलमध्ये लागू असलेली प्रवेशबंदी १० डिसेंबरपर्यंत आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३अंतर्गत रविवारपर्यंत लागू असलेली संचारबंदी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आम्हाला का थांबवण्यात आले ते समजत नाही. विरोधी पक्षाचे नेते आणि खासदार इतके बेजबाबदार आहेत का की त्यांना राज्याच्या आतमध्ये फिरू दिले जात नाही?-हरेंद्र मलिक, खासदार, समाजवादी पक्ष

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entry ban in sambhal extended till december 10 amy