पीटीआय, कारगिल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लडाखला राज्याचा दर्जा मिळावा आणि राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये त्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी बुधवारी हजारो लडाखवासीयांनी मोर्चा काढला. त्यामुळे दुकाने आणि कार्यालये बंद राहिली.

लडाख या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याला सहाव्या अनुसूचींतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावे या मागणीसाठी लडाखवासीय पर्यावरणवादी सोनम वांगचुक गेल्या दोन आठवडय़ांपासून उपोषण करत आहे. ‘कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स’च्या (केडीए) आवाहनाला प्रतिसाद देत निदर्शकांनी मोठय़ा संख्येने फातिमा चौक ते हुसैनी पार्क असा मोर्चा काढला.

हेही वाचा >>>‘आरोपींना खटल्याशिवाय डांबून ठेवणं चुकीचं’, सर्वोच्च न्यायालयाची आता ईडीला चपराक

आंदोलकांनी मुख्य बाजारपेठेत निदर्शने केली. तसेच घोषणाबाजी करण्यात आली. ‘अपेक्स बॉडी लेह’ (एबीएल) आणि ‘केडीए’ या संघटना विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संघटना, विविध गटांचे या आंदोलनात नेतृत्व करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmentalist sonam wangchuk hunger strike to demand restoration of statehood to ladakh amy