संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताने देशातील १५२ देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.
दिल्लीतील राजपथावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३५ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक दूतावासात तीन प्रवेशपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
तथापि, पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे प्रत्येक उच्चपदस्थ राजनैतिक अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होण्याची अपेक्षा नाही, असे सूत्रांनी सांगितले.
या कार्यक्रमात ३५ ते ४० हजार जण सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सशस्त्र दलातील पाच हजार कर्मचारीही सहभागी होणार आहेत.
योग दिन कार्यक्रमाचे १५२ देशांच्या दूतावासांना निमंत्रण
संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी भारताने देशातील १५२ देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना निमंत्रण दिले आहे.दिल्लीतील राजपथावर सकाळी ७.३० ते सायंकाळी ७.३५ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येक …

First published on: 09-06-2015 at 01:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Envoys from 152 foreign missions invited for international yoga day