नवी दिल्ली : ‘इंडिया’तील जागावाटपाच्या सूत्रामध्ये राज्या-राज्यांमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागांचा आकडा प्रदेश काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे सादर केला असून महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या जागावाटपाबाबत पुढील आठवडयामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष, विरोधीपक्षनेते तसेच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच, राहुल गांधींच्या आगामी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या आयोजनावर चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यामध्ये काँग्रेस किती जागांवर दावा केला पाहिजे, यासंदर्भात खरगे व राहुल गांधी यांच्याकडे आग्रही मत मांडल्याचे समजते. ‘इंडिया’च्या घटक पक्षांशी जागावाटपाची बोलणी करण्यासाठी काँग्रेसने मुकुल वासनिक यांची समिती नेमून राज्या-राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला असून हा अहवाल खरगेंना सादर केला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राज्यांतील अन्य नेत्यांची या समितीशी चर्चा झाली आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
Eknath shinde late for rally
भंडारा: साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचा पत्ता नाही, लोकांचा सभास्थळाहून काढता पाय
cm eknath shinde
“हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
Assembly Election 2024, Doctor, Manifesto
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टरांचा जाहीरनामा! राजकारण्यांकडे केलेल्या मागण्या जाणून घ्या…

हेही वाचा >>> सरकारी निवासस्थानात राहण्याची मुभा: मोईत्रांनी मालमत्ता संचालनालयाकडे जावे

जागावाटपाचे सूत्र?

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते २३ जागांवर हक्क सांगत आहेत. जागावाटपाच्या सूत्रामध्ये अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक भूमिका करत असले तरी दिल्लीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या प्रमुखांच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये तडजोड होईल असे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एखाद-दोन दिवसांमध्ये जागावाटपासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा होणार आहे. त्यानंतर जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे समजते. काँग्रेसला २० हून अधिक जागांची अपेक्षा असली तरी त्यातही तडजोड होऊ शकते. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याचा तिढा अजूनही कायम आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची खरगेंशी चर्चा झालेली नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीत वंचितवरही निर्णय घेतला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीसंदर्भात निर्णय झाला तर वंचितला शिवसेनेच्या कोटयातून जागा दिल्या जातील तसे झाले तर शिवसेनेला २०-२१ जागा देण्यावर चर्चा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेस १०-१२ जागांवर दावा केला तर त्यामध्ये दोन-तीन जागा छोटया पक्षांना दिल्या जाऊ शकतात. या जागावाटपाच्या ठोबळ सूत्रामध्ये दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मतदारसंघनिहाय बदल व जागांची संख्या निश्चित केली जाणार असल्याचे समजते.