Errol Musk Claim About Barack Obama Wife: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा वादग्रस्त विधाने केल्याचेही आपण पाहिले आहे. आता त्यामध्ये त्यांच्या वडिलांचीही भर पडली आहे. एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले असून, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्या लिंगाबद्दल एक विचित्र दावा केला आहे.

एरॉल मस्क यांनी म्हटले आहे की, “मिशेल ओबामा या पुरुष आहेत आणि त्या स्त्रीसारखे कपडे घालतात.” त्यांनी असाही आरोप केला आहे की, मिशेल ओबामा यांचे पती आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा “क्वेअर” आहेत. एरॉल मस्क यांच्या या दाव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर युजर्सही बऱ्या वाईट प्रतिक्रिया देत आहेत.

मिशेल ओबामा पुरूष आहेत

“आम्हाला कळले आहे की, ओबामा समलैंगिक आहेत. त्यांचे लग्न एका पुरुषाशी झाले आहे, जो स्त्रीसारखे कपडे घालतो. आम्हाला सर्व कळते,” असे त्यांनी ‘वाइड अवेक पॉडकास्ट’ वर बोलताना म्हटले आहे.

हे ऐकून पॉडकास्टच्या होस्टला धक्काच बसला. तेव्हा तो म्हणाला, “मिशेल ओबामा पुरुष आहेत?” याला उत्तर देताना एरॉल मस्क म्हणाले “अर्थात, तुम्हाला माहित नाही?”

दरम्यान बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांची पहिली भेट १९८९ मध्ये एका लॉ फर्ममध्ये झाली होती. त्यानंतर १९९२ मध्ये त्यांनी लग्न केले. त्यांना मालिया (२६) आणि साशा (२३) नावाच्या दोन मुली आहेत.

एलॉन मस्का चांगले वडील नाहीत

मुलाखतीदरम्यान एरॉल मस्क असेही म्हणाले की, त्यांचा मुलगा एलॉन हे चांगले वडील नाहीत. यावेळी त्यांनी एलॉन मस्क यांच्या पालकत्वाच्या कौशल्यांवरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, एलॉन मस्क त्यांच्या मुलांना वेळ देत नाही.

कोण आहेत एरॉल मस्क?

एरॉल मस्क हे उद्योगपती एलॉन मस्क यांचे वडील आहेत. एरॉल मस्क इलेक्ट्रिकल इंजिनियर, पायलट, आणि लँड सर्व्हेयर होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत यशस्वी उद्योजक म्हणून नाव कमावले होते. एरॉल मस्क यांच्याबरोबर एलॉन मस्क यांनीही त्यांच्या आयुष्यातील काही काळ दक्षिण आफ्रिकेत घालवला आहे. दरम्यान मस्क पिता-पुत्रांचे संबंध काहीशे वादग्रस्त राहिले आहेत. त्यांच्यातील संबंध अनेक वेळा ताणले गेल्याचेही पाहायला मिळाले आहे.