राष्ट्रीय राजधानीत सोमवारी सकाळी ५.३६ वाजता जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. ४.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, भूकंपाचे केंद्र दिल्लीत होते. भूकंपाचे केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त ५ किमी खाली होते. पृष्ठभागापासून पाच किंवा दहा किमी खाली येणारे उथळ भूकंप, पृष्ठभागाच्या खाली येणाऱ्या भूकंपांपेक्षा जास्त नुकसान करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना शांत राहण्याचे, सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करण्याचे आणि “संभाव्य आफ्टरशॉक” साठी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसंच, अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचीही माहिती त्यांनी एक्सद्वाे दिली.

दिल्लीत सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असून भूंकपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्रांच्या झोन चारमध्ये दिल्लीचा समावेश आहे. ही श्रेणी दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च श्रेणी आहे. गेल्या काही वर्षांत दिल्लीत ४ रिश्टर स्केलचे अनेक भूकंप झाले. २०२२ मध्ये दिल्लीच्या शेजारील हरियाणा राज्यात ४.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. हासुद्धा उथळ भूकंप होता. युएस जिओलॉजिकल सर्व्हेच्या आकडेवारीनुसार गेल्या १० वर्षांत दिल्लीत ५ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचा भूंकप नोंदवला गेला नाही.

आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांनी घराबाहेर पळापळ केली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून नागरिक भयभीत झाले आहेत.

दिल्लीला सातत्याने भूकंपाचे धक्के

हिमालय, अफगाणिस्तान किंवा चीनमध्ये उद्भवणाऱ्या भूकंपांसह दूरवरच्या भूकंपांचेही वारंवार धक्के दिल्लीला जाणवतात. पृथ्वीच्या आत खोलवर – पृष्ठभागाच्या १०० किमी किंवा त्याहून अधिक खाली – उद्भवणारे भूकंप लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात. परंतु, मूळ स्थानापासून जितके जास्त अंतर असेल तितके नुकसान होण्याची शक्यता कमी असते कारण भूकंप प्रवास करताना वेगाने ऊर्जा गमावतात आणि कमकुवत होतात.

भूकंप किती सामर्थ्यशाली होता हे रिश्टर एककाने मोजणी केली असता समजते. भूकंपाच्या आलेखावरून भूकंपाची क्षमता मोजण्याची पद्धती १९३५ साली चार्ल्स फ्रान्सिस रिश्टर यांनी विकसित केली. त्यांच्या सन्मानार्थ भूकंपाच्या क्षमतेच्या मोजणीच्या एककाला रिश्टर असे नाव देण्यात आले. या पद्धतीने भूकंपवेत्त्यांना भूकंपामुळे भूगर्भातून किती ऊर्जा मुक्त झाली ते अगदी अचूकपणे सांगता येते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Erthquake of magnitude 4 shakes delhi pm modi urges people to saty alert sgk