लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी त्रिपुरात ८२ टक्के तर आसाममध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. त्रिपुरातील एका मतदारसंघासाठी तर आसाममधील पाच मतदारसंघांसाठी मतदान शांततेत पार पडले. आसाममधील तेजपूरमध्ये ७३ टक्के, जोरहाटमध्ये ७५ टक्के, लखीमपूरमध्ये ६७ टक्के, दिब्रूगडमध्ये ७० टक्के आणि कोलियाबोरमध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार पवनसिंग घटोवार आणि राणी नाराह यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री बी. के. हांडिक यांचे भवितव्य सोमवारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंदिस्त झाले. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र गौरव, काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार मोनीकुमार सुब्बा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सबानंद सोनोवाल यांचेही भवितव्य यंत्रात बंदिस्त झाले. आसाममध्ये प्रथमच मतदान करणारे १८-१९ वर्षे वयोगटातील जवळपास ६.५ लाख मतदार असून ते मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरले होते.
त्रिपुरात ८२% तर आसाममध्ये ७२% मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात सोमवारी त्रिपुरात ८२ टक्के तर आसाममध्ये ७२ टक्के मतदानाची नोंद झाली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-04-2014 at 02:00 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Estimated 72 pc votes cast in assam