इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियातील नैरोबी येथे जात असलेले एक विमान कोसळले आहे. या विमानात ८ क्रू सदस्यासंह १५७ लोक प्रवास करत होते. इथिओपियातील पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बोईंग ७३७ विमानाने आपले नियमित उड्डाण केले होते. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे रॉयटर्सने या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. या दुर्दैवी विमान अपघातात भारताच्या चार प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. मृत प्रवाशांमध्ये भारतीयांसह कॅनडा, चीन, अमेरिका, इटली, ब्रिटिश, इजिप्त देशातील नागरिकांचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इथिओपियन एअरलाइन्सने याप्रकरणी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, बोईंग ७३७-८०० एमएएक्स विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.३० वाजता अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. परंतु, ८.४४ वाजता त्याचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला.

एअरलाइन्सने आपल्या निवेदनात पुढे म्हटले की, आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. इथिओपियन एअरलाइन्सने प्रवाशांच्या माहितीसाठी माहिती केंद्र सुरू केले आहे. दरम्यान, विमानकंपनीने आपातकालीन क्रमांक जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या नातेवाईकांना या क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवता येईल.