वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम

गाझामधील युद्धजखमींचा पहिला गट बुधवारी राफा सीमेद्वारे इजिप्तमध्ये पोहोचला. जखमींना घेऊन जाणाऱ्या अनेक रुग्णवाहिका दाखल झाल्याचे वृत्त इजिप्तमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. कतारच्या पुढाकाराने इजिप्त, इस्रायल आणि हमास यांच्यादरम्यान झालेल्या समझोत्यानुसार, अनेक परदेशी व्यक्ती आणि गंभीररीत्या जखमी लोकांना गाझा पट्टीतून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे.इस्रायली सैन्याने मंगळवारी जबालिया या गाझामधील सर्वात मोठय़ा निर्वासितांच्या छावणीवर हवाई हल्ले केले. त्यामध्ये जवळपास ५० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. तर या हल्ल्यांमध्ये हमासचा वरिष्ठ कमांडर इब्राहिम बियारीसह अन्य अतिरेकी ठार झाल्याचे इस्रायलकडून सांगण्यात आले. या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांसह सात ओलिसांचा मृत्यू झाल्याचे हमासने सांगितले. तर मंगळवारच्या धुमश्चक्रीत आपले ११ सैनिक ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Prime Minister announces free elections in Syria
Syria : सीरिया बंडखोरांच्या ताब्यात! ७५ भारतीयांचं यशस्वी स्थलांतर; लवकरच मायदेशी परतणार
Syria Civil War
Syria Crisis: “सीरीया शुद्ध होत आहे”; असद यांची राजवट उलथवल्यानंतर बंडखोरांचा नेता अबू जोलानीची मोठं वक्तव्य
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
Haryana security personnel stopped the farmers march at the Shambhu border of Punjab-Haryana
शेतकरी मोर्चा एक दिवस स्थगित; शंभू सीमेवर रोखले
Syrian army withdrew from most of the country south on Saturday
सीरियात बंडखोरांची आगेकूच; देशाच्या दक्षिण भागातून लष्कराची माघार

साधारण ५०० परदेशी नागरिकांना राफा सीमेतून प्रवेश दिला जाईल असे इजिप्तच्या सुरक्षा सूत्रांकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर बुधवार सकाळी सीमेवर गर्दी झाली. मात्र, परदेशी नागरिक तसेच जखमींना किती काळ सीमेवरून प्रवेश दिला जाईल याचे कोणतेही वेळापत्रक नसल्याची माहिती अन्य सूत्रांनी दिली.मिळालेल्या माहितीनुसार, हा समझोता करताना हमासच्या तावडीतून साधारण २४० ओलिसांची सुटका किंवा मानवतावादाच्या दृष्टिकोनातून युद्धविराम याबद्दल अटी ठेवण्यात आल्या नाहीत. गाझामध्ये मदत सामग्रीच्या वितरणासाठी अनेक देशांना तात्पुरत्या युद्धविरामाचे आवाहन केले आहे. मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ते मान्य केले नाही.

हेही वाचा >>>निवडक गोपनीयता, समान संधीचा अभाव! निवडणूक रोख्यांच्या योजनेवर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

३४ पत्रकारांचा मृत्यू

या युद्धाचे वार्ताकन करणाऱ्या ३४ पत्रकारांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती ‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर’ या संघटनेने बुधवारी दिली. दोन्ही बाजूंनी युद्धासंबंधी गुन्हे केले जात आहेत अशी टीका या संघटनेने केली.

सलग दुसऱ्या दिवशी निर्वासितांच्या छावणीवर हल्ला

इस्रायलच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी गाझामधील निर्वासितांच्या छावणीमधील इमारतीला लक्ष्य केल्याची माहिती स्थानिक सरकारने दिली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात जीवितहानी झाली असून अनेकजण जखमी झाल्याचे गाझामधील सरकारने सांगितले.

हेही वाचा >>>Telangana : भाजपाचे रणनीतीकार जी. विवेकानंद यांचा पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश; भाजपाचे नुकसान होईल?

विजेबरोबरच इंटरेनट बंद

मंगळवारी रात्रभर इस्रायलच्या सैन्याने गाझावरील हल्ले सुरू ठेवले. उत्तर, दक्षिण आणि पूर्व भागामध्ये हमास आणि इतर गटांबरोबर इस्रायलच्या फौजांची धुमश्चक्री झाली. त्यानंतर बुधवारी फोन आणि इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद राहिली.

जॉर्डनचे कठोर पाऊल

युद्धाच्या निषेधार्थ अमेरिकेचा महत्त्वाचा मित्रदेश असलेल्या जॉर्डनने इस्रायलमधून आपले राजदूत माघारी बोलावले. तसेच इस्रायलच्या राजदूतांना मायदेशी जाण्यास सांगितले. युद्ध संपल्यावर राजदूतांना परत बोलावले जाईल असे जॉर्डनने स्पष्ट केले.

Story img Loader