पीटीआय, मुंबई : दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेण्यात येणार असल्या तरी त्यांचा वैध आणि विधिसंमत चलन म्हणून दर्जा कायम राहणार आहे, अशी माहिती रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. तथापि, या संबंधात काढलेल्या परिपत्रकात ३० सप्टेंबपर्यंत नोटा बदलून किंवा बँकांमध्ये जमा न केल्यास काय होईल, याबद्दल काहीही स्पष्टपणे नमूद केलेले नसल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाची स्थिती कायम आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग म्हणून दोन हजारांच्या नोटा मागे घेतल्या गेल्या असून वैध चलन म्हणून या नोटेचा दर्जा कायम राहणार असल्याने दास यांनी सोमवारी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे दोन हजारांची नोट पुढेही वस्तू व सेवा खरेदीसाठी वापरता येऊ शकते, असे ते म्हणाले. दास यांच्या मते, दोन हजारांच्या बहुतांश नोटा ३० सप्टेंबपर्यंत परत येतील. अंतिम मुदत जवळ येईल तेव्हा बदलण्यात आलेल्या नोटांचे प्रमाण लक्षात घेऊन गरज पडल्यास मुदतवाढीचा निर्णयही घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. परदेशात दीर्घकालीन दौरा अथवा कामासाठी गेलेल्या नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत रिझव्‍‌र्ह बँक संवेदनशील आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवून ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यास आमचे प्राधान्य आहे, असे दास यांनी सांगितले.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
kopri pachpakhadi vidhan sabha election 2024
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘अर्थव्यवस्थेवर किरकोळ परिणाम’

दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याच्या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अतिशय किरकोळ परिणाम होईल, कारण या नोटांचे चलनातील प्रमाण केवळ १०.८ टक्के आहे, अशी माहिती दास यांनी दिली. दोन हजारांच्या नोटांचा सर्वसाधारण व्यवहारात कमी वापर होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे ते म्हणाले. एक हजाराची नोट चलनात आणण्याचा सध्या तरी कोणताही प्रस्ताव नसल्याचेही दास यांनी स्पष्ट केले.

३० सप्टेंबरनंतर ओळखपत्र लागणार?

२०१४मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने २००५ पूर्वी छपाई झालेल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या होत्या. १ एप्रिल २०१४च्या मुदतीनंतर नोटा वैध चलन म्हणून कायम राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर १ जुलैपासून १० पेक्षा अधिक नोटा बदलण्यासाठी ग्राहकांना ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले होते. यावेळीही वेगळे परिपत्रक काढून असाच निर्णय होण्याची शक्यता आहे.

रिझव्‍‌र्ह बँकच नव्हे तर इतर बँकांकडेही इतर मूल्याच्या चलनी नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आमच्याकडे नोटांचा मुबलक साठा आहे, त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी घाई केली जाऊ नये.

– शक्तिकांत दास, गव्हर्नर, रिझव्‍‌र्ह बँक