रशिया आणि युक्रेनदरम्यान गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे अनेक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारक़डून तिकडे अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यांनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


केंद्रीय मंत्री व्ही. के.सिंग हे पोलंडकडे रवाना होणार आहेत. तिथून ते युक्रेनमधल्या भारतीयांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. याविषयी बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे. युक्रेनमध्ये अडचणीत असलेला एकही भारतीय नागरिक मागे राहणार नाही. युद्धक्षेत्रात बंधने आहेत, संभ्रम आहेत, सीमांवरही काही अडचणी आहेत. तुमच्याकडे संयम नसेल आणि तुम्ही सूचनांचे पालन केले नाही, तर परिस्थिती बिकट होऊ शकते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करताना सिंग पुढे म्हणाले, तुम्ही मंगळावर जरी अडकला असाल तरी भारतीय दुतावास तुमची मदत करेल. ही भारताची रणनीती आहे. पंतप्रधान मोदी याबाबतीत दूरदृष्टीने विचार करत आहेत. त्यामुळे ते चार मंत्र्यांना पाठवत आहेत. सरकार त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यांनी केवळ संयम ठेवून सुरक्षित राहावं.


भारतीय नागरिकांना युद्धभूमीतून परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा राबवण्यात येत आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक घेत चार मंत्र्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हरदीप पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरेन रिजीजू आणि निवृत्त जनरल व्ही. के. सिंग हे चार मंत्री या मोहिमेवर जाणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even if youre stuck on mars indian embassy will help you v k singh vsk
First published on: 01-03-2022 at 08:41 IST