भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे कट्टरविरोधी मानले जाणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी यावेळी अनपेक्षितरित्या मोदींची विचारसरणी बदलत चाचली असल्याचे मी स्वागत करतो तसेच एखादा चहावालाही देशाचा पंतप्रधान बनू शकतो असे विधान केले आहे.
दिग्विजय म्हणाले, “मोदी हे त्यांच्या अतिरेकी विचारसरणीपासून दूर चालले आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या विचारसरणीजवळ मोदी येत असल्याचे मी स्वागत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आपल्या कडव्या विचारसरणीपासून दूर जात आहेत आणि चहावालाही या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केल्याने भाजप सुखावला आहे. दिग्विजय सिंग यांचे वक्तव्य म्हणजे मोदी यांची स्तुती असल्याने भाजपने त्याचे स्वागत केले आहे.
कडव्या विचारसरणीपासून मोदी दूर जात असल्याचे आपण स्वागत करतो, असे दिग्विजय सिंग म्हणाले. संघ आणि भाजप काँग्रेस आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या विचारसरणीच्या जवळ आल्यास त्याचेही स्वागतच करू, असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे.
पुढील निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आल्यास देशातील जनता मोदी यांना स्वीकारणार नाही, त्याऐवजी आपण सुषमा स्वराज यांना अधिक पसंती देतो, असेही ते म्हणाले. लोकशाही असलेल्या देशात केरळमधील मेंढपाळ राष्ट्रपती होऊ शकतो, तर चहावालाही पंतप्रधान होऊ शकतो, असे दिग्विजय सिंग म्हणाले. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांनी सिंग यांच्या वक्तव्याचे स्वागत केले आहे.

Story img Loader