पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या दहशतवाद्यासारखे दिसतात. कधी ते आपल्यावर कोणता बॉम्ब टाकतील याची सतत भीती वाटते. त्यामुळे मोदींना सगळेच लोक घाबरतात. जनतेवर प्रेम करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेला घाबरवत आहेत. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या माणसाने कसं नसावं याचं उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या आणि अभिनेत्री विजयाशांती यांनी केलं आहे. तेलंगण येथे झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत त्या बोलत होत्या.

लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. लोकसभा २०१९ च्या निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांमधली लढाई आहे. हा रणसंग्राम कोण जिंकणार? त्यासाठी काय काय रणनीती वापरली जाणार हे स्पष्ट होईलच. अशातच काँग्रेस नेत्यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरून अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसंच १५ मिनिटं माझ्याशी चर्चा करून दाखवा असंही आव्हान देऊन झालं आहे. या सगळ्या दरम्यान १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याचं प्रत्युत्तर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दिलं. या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर होणारी टीका काही प्रमाणात मागे पडली होती.

आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं जातं आहे. विजयाशांती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात. देशाला त्यांची दहशत वाटते असं म्हटलं आहे. सगळ्या जनतेला ते घाबरवत आहेत असंही विजयाशांती यांनी म्हटलं आहे. आता या टीकेला भाजपा काय उत्तर देणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader