समलिंगी संबंध दखलपात्र गुन्हा ठरविण्याची भारतीय दंडविधान संहितेतील तरतूद न्यायालयाने आज (बुधवार) घटनात्मक ठरविली. त्यानुसार भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधाचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला जन्मठेपपर्यंतीच शिक्षा होऊ शकते यावर शिक्कामोर्तब झाले. हा निर्णय समजल्यावर समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱया आंदोलकांनी देशभर नाराजी व्यक्त केली. सोशल मिडिया साईटवरही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पण हा विषय नेमका काय आहे, याबाबात वाचकांना माहिती व्हावी यासाठी घेतलेला हा आढावा.   
 
समलिंगी संबंध म्हणजे काय?
समलिंगी (होमो सेक्शुअल) ही नैसर्गिक अवस्था म्हणता येऊ शकते. ७ ते १४ या वयात ती जन्माला येते. या वयात येणार्‍या काही जणांना समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू शकते. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं/मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही.

समलिंगी संबंध म्हणजे काय?
समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध.

Case against tuition teacher, tuition teacher pune,
मुलीशी अश्लील कृत्य प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Request to the court to quash the rape charges against the boy by the girl in Nagpur news
मुलगी न्यायालयात म्हणाली, चुकीने बलात्काराची तक्रार…आता मला भूतकाळ…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!

गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय?
पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते.

समलैंगिक असणं अनैसर्गिक आहे का?
समलिंगी असणं नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेच तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो.

समलैंगिक असणं ही विकृती किंवा आजार आहे का?
समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला – स्त्रीचं, पुरुषाला – पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, भारतीय समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं.

समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर कारणे?
पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यांना कमी धोकादायक वाटतं.

समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे?
भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना मान्यता नाही; मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींला जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

Story img Loader