इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि इंजिनिअर तसंच प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी आज नव्या संसद भवनाचा दौरा केला. जुनी संसद इमारत आणि नवी संसद इमारत त्यांनी पाहिली. ज्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. ANI शी बोलताना त्यांनी नव्या संसद इमारतीचं कौतुक केलं. “ही इमारत खूपच सुंदर आहे. मला प्रदीर्घ काळापासून या ठिकाणी भेट द्यायची होती आज योग आला” असं सुधा मूर्ती यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाल्या सुधा मूर्ती?

“नव्या संसद भवनात कला, संस्कृती, भारताचा इतिहास हे सगळंच पाहण्यास मिळालं आणि हा एक सुंदर अनुभव होता. माझ्याकडे या संसदेचं वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. मी आज दोन्ही इमारती पहिल्यांदा पाहिल्या. खूप छान पद्धतीने मांडणी केली आहे.”

हे पण वाचा- नारायण अन् सुधा मूर्ती पुन्हा झाले आजी-आजोबा; मुलगा रोहनला पुत्ररत्नाची प्राप्ती

“मला संसदेची नवी इमारत खूपच आवडली. कला, संस्कृती आणि आपला इतिहास या सगळ्या गोष्टी इथे आहेत. सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत. मी आज इथे पहिल्यांदा आले. मला संपूर्ण दिवस इथे घालवायाचा होता. या दोन्ही इमारती पाहून खूपच आनंद झाला.” असं सुधा मूर्ती म्हणाल्या.

राजकारणात येणार का?

नव्या आणि जुन्या संसदेचा दौरा केलात आता राजकारणात यायचा विचार आहे का? यावर सुधा मूर्ती म्हणाल्या, “मी जिथे आहे तिथे खुश आहे. मला राजकारणात वगैरे मुळीच यायचं नाही.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everything is beautiful no words to describe sudha murty on first visit to new parliament scj
Show comments