आर्थिक दुर्बलांना (ईडब्ल्यूएस) नोकरी आणि शिक्षण प्रवेशांसाठी देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालय आज (७ नोव्हेंबर) ऐतिहासिक निर्णय देत शिक्कामोर्बत केलं. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून करण्यात आलेली आरक्षणाची तरतूद वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. वेगवेगळ्या याचिकांच्या माध्यमातून आरक्षणासह घटनादुरुस्तीच्या वैधतेला आव्हान देण्यात आले होते. याच याचिकांवरील सुनावणीनंतर सरन्यायाधीश उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निकाल दिला आहे. पाचपैकी तीन न्यायाधिशांनी या आरक्षणाच्या बाजूने मत मांडल्याने आरक्षण कायम ठेवलं जाणार आहे. विशेष म्हणजे निकालपत्र वाचून दाखवताना न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं. त्याचप्रमाणे न्या. जमशेद पादरीवाला यांनीही आरक्षणासंदर्भात महत्त्वाचं टीप्पण केलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा