गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत असणाऱ्या खटल्यात अखेर न्यूयॉर्क न्यायालयाने निकाल दिला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष व सध्या राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचंच नाव या प्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून असल्यामुळे हे प्रकरण जगभरात चर्चेचा विषय ठरलं होतं. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सनं ट्रम्प यांच्याशी पूर्वी असलेल्या संबंधांवर केलेलं भाष्य प्रसिद्धीस येऊ नये, म्हणून ट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हा आर्थिक गैरव्यवहार केल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. आता ट्रम्प यांना काय शिक्षा सुनावली जाणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुरुवारी या प्रकरणाची तब्बल साडेनऊ तास सलग अंतिम सुनावणी पार पडली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना सर्व ३४ आरोपांमध्ये दोषी धरण्यात आलं. न्यायालयात हे सर्व घडत असताना डोनाल्ड ट्रम्प पूर्णवेळ निर्विकार चेहऱ्यानं खाली मान घालून बसून होते.
‘हश मनी’ प्रकरण नेमकं काय?
स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न अभिनेत्रीने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधी किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. त्यांना प्रसिद्धी मिळू नये यासाठी ट्रम्प यांनी, २०१६मधील अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना स्टॉर्मी डॅनियल्सला १,३०,००० डॉलर्स दिले. हे पैसे ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या वतीने ट्रम्प यांच्या सांगण्यावरून देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कधीतरी ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले. परंतु ही देयके कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवले गेले.
विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?
डोनाल्ड ट्रम्प यांना काय शिक्षा होणार?
अमेरिकेत सध्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचा निर्धार व्यक्त करून प्रचारासाठी कंबर कसली आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आलेल्या या निकालाचा ट्रम्प यांच्या प्रचारावर परिणाम होणार असल्याचं मानलं जात आहे. त्यातच, ट्रम्प यांना काय शिक्षा होणार? यावरही अमेरिकेतील निवडणुकीतली बरीचशी समीकरणं अवलंबून असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
डोनाल्ट ट्रम्प यांना न्यूयॉर्क कोर्टानं फेलनी ई प्रकारच्या प्रकरणात दोषी सिद्ध केलं आहे. सामान्यत: अमेरिकेत आर्थिक गैरव्यवहार हा गुन्हा ठरत असला, तरी एखादं प्रकरण दडपण्यासाठी केलेला आर्थिक गैरव्यवहार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो. ट्रम्प यांच्या बाबतीत पॉर्न अभिनेत्रीच्या दाव्यांचं प्रकरण दडपण्यासाठी त्यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केलेला गैरव्यवहार महत्त्वाचा ठरला. त्या आधारावर त्यांना दोषी सिद्ध करण्यात आलं आहे.
म्हातारे तितुके.. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन!
शिक्षा कधी सुनावणार?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध झाले असले, तरी त्यांना शिक्षा सुनावण्यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. ज्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले आहेत, त्या प्रकरणासाठी न्यूयॉर्कमध्ये किमान ४ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र, याचिकाकर्त्यांनी ट्रम्प यांना तुरुंगवासाच्या शिक्षेची मागणी अद्याप प्रस्तावित केलेली नाही. तसेच, या प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर झाली, ते न्यायमूर्ती हुआन मोर्शान यांच्याबाबतीतही संभ्रम आहे. ट्रम्प यांच्यावर याआधी कोणताही गंभीर गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांना किरकोळ तुरुंगवास किंवा प्रोबेशनवर पाठवणी अशा स्वरूपाचा निर्णय न्यायमूर्ती घेऊ शकतात.
आणखी तीन फेलनी ई प्रकरणांचे खटले
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अशाच प्रकारच्या आणखी तीन फेलनी प्रकरणांचे खटले चालू आहेत. मात्र, फक्त याच प्रकरणात ते दोषी सिद्ध ठरू शकतात. कारण नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे. तोपर्यंत फक्त याच खटल्याचं काम पूर्ण होऊ शकतं. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांना या एकाच खटल्याचा सामना करावा लागणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, भरावा लागणार ३५५ दशलक्ष डॉलरचा दंड, नेमकं कारण काय?
राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीचं काय होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्क कोर्टाने दोषी सिद्ध केल्यामुळे आता त्याचा त्यांच्या उमेदवारीवर किंवा प्रचारावर काय परिणाम होईल? अशी चर्चा सुरू झाली आहे. यामुळे त्यांचे विरोधक जो बायडेन आणि त्यांच्या समर्थकांना ट्रम्प यांच्याविरोधात आणखी तिखट प्रचार करण्याची संधी मिळेल. पण दोषी व्यक्तीला निवडणूक लढवण्यापासून प्रतिबंधित करणारी तरतूद न्यूयॉर्कच्या कायद्यांमध्ये नाही. त्या आधारावर त्यांना निवडणूक लढवता येईल, असं मानलं जात आहे. मात्र, न्यायमूर्तींनी या प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतरच याबाबत स्पष्टता येऊ शकेल.