केंद्रीय अन्वेषण विभाग तपास करीत असलेल्या प्रकरणाशी संबंधित अनेक जणांनी सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांची भेट घेतल्याची माहिती उघड झाली आहे. रणजित सिन्हा यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरील अभ्यागत नोंदींवरून ही माहिती उघड झाली. २०१३ आणि २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये सिन्हा यांनी वादग्रस्त ठरू शकतील, अशा लोकांच्या भेटी घेतल्याचे स्पष्ट झाले.
नवी दिल्लीमध्ये दोन जनपथ येथे सिन्हा यांचे शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर कोण कोण अभ्यागत सिन्हा यांना भेटण्यासाठी आतमध्ये गेले याची संपूर्ण दिवस नोंद ठेवली जाते. या नोदींचा तपशील ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने तपासाला. सुमारे १५ महिन्यांच्या कालावधीतील ३१० पानांचा तपशील बघितल्यानंतर सीबीआयकडून ज्या प्रकरणांचा तपास सुरू आहे किंवा तपास पूर्ण झाला आहे, त्यांच्याशी संबंधित अनेकांनी मे २०१३ ते ऑगस्ट २०१४ या कालावधीत सिन्हा यांची भेट घेतली होती, असे उघड झाले.
अनिल धीरूभाई अंबानी समूहातील काही अधिकाऱय़ांचीही सिन्हा यांनी भेट घेतली होती. टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये याच समूहातील काही अधिकाऱय़ांची चौकशी सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी सिन्हा यांची भेट घेतली असून, ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला कळविण्यात आली आहे. याप्रकरणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अभ्यागत नोंदी तपासल्यावर कॉंग्रेसचे खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांनी सिन्हा यांची भेट घेतल्याचे दिसून आले. कोळसा खाण वाटप गैरव्यवहारामध्ये दर्डा यांचे नाव आरोपींच्या यादीमध्ये आहे. देवेंद्र दर्डा यांनी वरील कालावधीत पाच वेळा सिन्हा यांची भेट घेतली होती. हिमाचल फ्युच्युरिस्टिक कम्युनिकेशन लिमिटेडचे प्रवर्तक महेंद्र नहाटा यांनी सर्वाधिक तब्बल ७१ वेळा सिन्हा यांची भेट घेतली. टू जी घोटाळ्यामध्ये ते आरोपी लाभार्थी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा