ललित मोदी यांच्या विरोधात थेट राष्ट्रपती भवनातून दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मोदींच्या अडचणी अधिकचं वाढणार आहेत.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सचिव ओमिता पॉल यांच्याविरोधात वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणीराष्टपती भवनाकडून मोदींविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओमिता पॉल यांचे हवाला ऑपरेटर्सची जवळचे संबंध असल्याचा आरोप ललित मोदी यांनी २३ जूनच्या एका ट्विटमध्ये केला होता. हा आरोप निराधार असल्याचा खुलासा राष्ट्रपती भवनाकडून लगेच करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रपती भवनाच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
याप्रकऱणी आमच्याकडे तक्रार आली असून याबाबतचा तपास सुरु असून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल असे दिल्ली पोलीस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी सांगितले.
राष्ट्रपती भवनाची ललित मोदींविरोधात तक्रार
ललित मोदी यांच्या विरोधात थेट राष्ट्रपती भवनातून दिल्ली पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे मोदींच्या अडचणी अधिकचं वाढणार आहेत.
First published on: 05-07-2015 at 03:13 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex chief of ipl in new row rashtrapati bhavan files complaint with delhi police against lalit modi