इस्लामिक स्टेट(आयसिस) या दहशतवादी संघटनेमध्ये सामिल होण्याच्या उद्देशाने निघालेल्या मुनावाद सलमान(३०) या भारतीय संगणक अभियंत्याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.
विशेष म्हणजे, मुनावाद सलमान हा गुगल या नावजलेल्या कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत होता. सलमान याने गूगलच्या हैदराबाद येथील कार्यालयामध्ये याआधी काम केले असून काही महिन्यांपूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. सलमान हा सौदी अरेबियाचा व्हिसा मिळविण्यासाठी प्रयत्नशील होता. सौदी अरेबियमधून इराकमध्ये जाण्याची योजना त्याने आखली होती.
मूळचा तमिळनाडुचा असलेला सलमान हा सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमामधून होत असलेल्या दहशतवादाच्या प्रचाराने प्रभावित होऊन या ‘आयसिस’मध्ये सहभागी होण्यास निघाल्याचे एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader