Salary Tripled After Divorce: गुगल कंपनीच्या माजी अधिकारी व्हीनस वांग यांनी एक आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. व्हीनस यांच्यामते घटस्फोटानंतर त्यांची कमाई तिप्पट झाली आहे. व्हीनस या २०२१ मध्ये घटस्फोटित आणि बेरोजगार होत्या. २०२० मध्ये त्यांना त्यांच्या मुलीच्या संगोपनासाठी गुगलमधील नोकरी सोडावी लागली. यानंतर काही कारणांमुळे त्यांना पतीपासून घटस्फोट घ्यावा लागला. याबाबत सीएनबीसी मेक इटने वृत्त दिले आहे.

घटस्फोटानंतर व्हीनस असहाय्य

घटस्फोटानंतर व्हीन यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. गुगलमधील नोकरी अचानक सोडावी लागल्यानंतर, तंत्रज्ञान क्षेत्रात पुन्हा कारकिर्द घडवण्यासाठी व्हीनस यांनी प्रथम एक स्टार्टअप सुरू करत एआयमध्ये काम केले. व्हीनस यांचे स्वप्न आर्थिक भविष्य पुन्हा उभारण्याचे होते. सततच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे, व्हीनस आज १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ८.७ कोटी रुपये) पगार घेतात. त्या सध्या एका आघाडीच्या टेक कंपनीच्या एआय विभागात काम करतात.

कोण आहेत व्हीनस वांग?

व्हीनस वांग यांचा जन्म आणि संगोपन मध्य चीनमधील कैफेंग येथे झाले. २०१३ मध्ये अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, व्हीनस यांना सिएटलमधील एका टेक कंपनीत पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर व्हीनस यांनी हार्डवेअर विभागात सोर्सिंग मॅनेजरचे पद मिळाले. पगारही सहा आकडी होता. त्यानंतर, अनेक वर्षे गुगलमध्ये काम केले. २०२० मध्ये वांग यांना गुगलमधील नोकरी सोडावी लागली.

पतीची बदली, गुगलची नोकरी सोडण्याचे कारण

व्हीनसची गुगलची नोकरी जाण्याचे कारण तिच्या पतीची बदली होती. असे असले तरी, २०२० मध्ये, कोरोना काळात, त्यांनी त्यांच्या मुलीचे संगोपन करण्यासाठी एक वर्षाची रजा घेण्याचा विचार केला होता. पुढच्याच वर्षी त्यांचा घटस्फोट झाला. एका मुलाखतीत व्हीनस यांनी घटस्फोटानंतर त्यांच्या बदललेल्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगितले होते. “घटस्फोटानंतर पत्नीपासून एकटी आई होणे ही एक मोठी जबाबदारी होती”, असे त्या म्हणाल्या होत्या.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

दरम्यान व्हीनस वांग यांनी घटस्फोटानंतर पगार तिप्पट वाढल्याचा दावा केल्यानंतर, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. एस युजर म्हणाला की, “संपत्ती निर्माण करण्यासाठी सकारात्मक आर्थिक सवयी असणे आवश्यक आहे. त्यांना, आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व कळले त्यामुळे ४२ व्या वर्षी त्यांचा पगार ९ कोटी रुपये आहे.”

यावेळी दुसरा एक युजरला व्हिनस वांग यांची गोष्ट प्रेरणादायी वाटली. दोन वर्षांत आर्थिक संकटातून करोडपती होण्याचा त्याचा स्वतःचा प्रवास सांगितला. त्यांनी शिस्त आणि स्मार्ट गुंतवणूक हे आर्थिक यश मिळवण्यासाठी महत्त्वाचे घटक असल्याचे अधोरेखित केले.

Story img Loader