३३ वर्षीय भारतीय विद्यार्थिनी चेइस्ता कोचर यांना मागच्या आठवड्यात लंडनमध्ये ट्रकने चिरडलं. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. चेइस्ता कोचर त्यांच्या पतीसह घरी परतत होत्या. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्या पीएचडी करत होत्या.

काय घडली घटना?

नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत यांनी त्यांच्या अपघाती मृत्यूची माहिती दिली. चेइस्ता कोचर यांच्यासह मी Life नावाच्या कार्यक्रमात काम केलं आहे. लंडनमध्ये सायकल चालवत असताना ही भयंकर दुर्घटना घडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चेइस्ता कोचर प्रतिभाशाली आणि हुशार होत्या. १९ मार्चच्या दिवशी त्यांना एका ट्रकने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती प्रशांत त्यावेळी त्यांच्यासह होते. ते चेइस्ता कोचर यांच्या मदतीसाठी धावले पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.

Woman dies after falling off her bike in Kondhwa Pune news
कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
kalyani nagar Porsche car accident
कल्याणीनगर अपघात प्रकरणात दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
malad east man died after struck by Electric shock
विजेचा धक्का लागून नाल्यात पडला, मालाड मधील दुर्घटनेत एकाचा मृत्यू
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात
10th student commits suicide before pre-examination
पूर्वपरीक्षेपूर्वी दहावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू

चेइस्ता कोचर यांच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?

जनरल एसपी कोचर (निवृत्त) हे चेइस्ता यांचा मृतदेह घेण्यासाठी लंडनला गेले आहेत. त्यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे. “मी लंडनला माझ्या मुलीचं पार्थिव घेण्यासाठी लंडनला पोहचलो आहे. १९ मार्चला ती सायकल चालवत होती त्यावेळी एका ट्रकने तिला चिरडलं. या घटनेमुळे आम्ही खूपच दुःखी झालो आहोत.”

हे पण वाचा- ‘इंटेल’च्या माजी अधिकाऱ्याचा सायकल अपघातात मृत्यू ; नवी मुंबईतील पामबिच मार्गावरील दुर्घटना

चेइस्ता कोचर लंडन स्कूल ऑफ अर्थशास्त्रात पीएचडी करत होत्या. मागच्या वर्षी ७ डिसेंबरला त्या लंडनला गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी दिल्ली विद्यापीठ, अशोक विद्यापीठ आणि शिकागो विद्यापीठातूनही पदवी घेतली आहे. त्यांनी नीत आयोगासह २०२१ ते २०२३ दरम्यान काम केलं होतं.