नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अलका लांबा यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बहुदा आम आदमी पक्षामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.
लांबा यांना कॉंग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कोणतेही पद नव्हते. त्याचबरोबर त्यांच्याकडे निवडणुकीच्या काळातही कोणतीच जबाबदारी देण्यात आली नव्हती, असे सांगत कॉंग्रेसने ही फार मोठी घडामोड नसल्याचे सूचित केले आहे. अलका लांबा हे नावच मी पहिल्यांदा ऐकतोय. कोण आहेत त्या? असा प्रश्न केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा यांनी विचारला. कॉंग्रेसमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता नाही. त्याचवेळी आम आदमी पक्षाची सर्व दारे आणि खिडक्या सध्या उघडी आहेत, असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.