Ex-Pakistan PM Imran Khan Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना बुधवारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या पहिल्या लुकची सोशल मीडियावर तुफान चर्चा चालू आहे. क्रिकेट ते राजकारण या दोन्ही ग्लॅमर्स क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या इम्रान खान यांचा पहिल्यांदाच असा अवतार कदाचित नेटकऱ्यांनी पाहिला आहे. ना केसाला रंग, ना दाढीला आकार अशा अस्थाव्यस्थ रूपात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान समोर आले होते. आपण त्यांचा व्हिडीओ नीट पाहिल्यास लक्षात येईल की, खुर्चीमध्ये बसलेले खान हे काही प्रमाणात अशक्त व म्हातारे दिसत आहेत. ७१ वर्षीय खान हे कदाचित पहिल्यांदाच मेकअपशिवाय व्हिडीओमध्ये दिसून आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून हटवलेले पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान बनल्यानंतर खान यांना पाकिस्तानमध्येचा अनेक खटल्यांना सामोरे जावे लागले होते. खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर १९० दशलक्ष पौंडच्या भ्रष्टाचार प्रकरणात रिअल इस्टेट टायकूनकडून कोट्यवधी रुपयांची जमीन लाच स्वरूपात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या खान यांनी काही आठवड्यांपूर्वी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आपल्या विरुद्ध झालेल्या कारवाईलाच आव्हान दिले होते.

इम्रान खान यांना का झाली होती अटक?

अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हे यूकेच्या नॅशनल क्राइम एजन्सीने पाकिस्तानला पाठवलेल्या सुमारे १९० दशलक्ष पौंड किंवा सुमारे ५० अब्ज रुपयांच्या घोटाळ्याचे आहे. हे पैसे पाकिस्तानमधील एका प्रॉपर्टी टायकूनकडून एजन्सीला परत मिळाले होते. खान पंतप्रधान असताना, ते पैसे राष्ट्रीय बँकेत ठेवण्याऐवजी, त्यांनी प्रॉपर्टी टायकूनला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला सुमारे ४५० अब्ज रुपयांचा मोठा दंड भरण्यासाठी वापरू दिले होते. त्या बदल्यात पंजाबच्या झेलम जिल्ह्यातील सोहावा नावाच्या परिसरात अल-कादिर विद्यापीठ नावाचे विद्यापीठ सुरू करण्यासाठी टायकूनने खान आणि बुशरा बीबी यांनी बनवलेल्या ट्रस्टला सुमारे ५७ एकर जमीन दिली होती.

या प्रकरणाचा उलगडा झाल्यावर खान यांना गेल्या वर्षी ऑगस्टपासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले होते. या प्रकरणात सध्या जामीन प्राप्त झाल्यावर पहिल्यांदाच खान कॅमेऱ्यासमोर आले होते.

हे ही वाचा<< ओवेसींच्या मतदारसंघात मतदाराला बाजूला करून EVM चं बटण दाबायला भलताच एजंट? Video ची दुसरी बाजू पाहिलीत का?

दुसरीकडे, पाकिस्तानच्या फेडरल सरकारने पाकिस्तान-तेहरिक-ए-इन्साफचे संस्थापक इम्रान खान यांच्या आज (गुरुवारी) होणाऱ्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) दुरुस्ती प्रकरणात व्हिडीओ कॉलद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर हजर राहण्याची परवानगी दिली होती. बुधवारी न्यायालयाने खान यांना जामीन मिळवण्यासाठी १० लाख रुपयांचे जामीनपत्र जमा करण्यास सांगितले होते. आता खान यांना जमीन मिळाला असला तरी अदियाला तुरुंगातून त्यांची अद्याप सुटका झालेली नाही कारण इद्दत आणि सायफर प्रकरणांमध्ये त्यांची शिक्षा अद्याप निलंबित केलेली नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex pakistan captain prime minister imran khan without hair dye makeup in shocking video first look after 10 months of arrest in corruption svs