नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक सुधारणांचे जनक आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. सिंग यांची ज्येष्ठ कन्या उपिंदर सिंग यांनी मुखाग्नी दिला. या प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांचे नेते अंत्यविधीसाठी उपस्थित राहिले. डॉ. सिंग यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डॉ. मनमोहन सिंग यांची पत्नी गुरशरण सिंग, तीनही मुली उपिंदर सिंग, दमन सिंग व अमृत सिंग यांच्यासह सिंग यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्कराच्या तोफगाडीतून डॉ. सिंग यांचे पार्थिव निगमबोध घाट स्मशानभूमीत आणले गेले. तिन्ही सैन्यदलांनी २१ तोफांची सलामी दिली. त्यानंतर धार्मिक विधींसह शासकीय इतमामात डॉ. सिंग यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी निगमबोध घाटावर उपस्थित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंग यांच्या कुटुंबाने भेट घेतली.

डॉ. सिंग यांना आदरांजली वाहण्यासाठी निगमबोध घाटावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह मोदी सरकारमधील इतर मंत्रीही उपस्थित होते. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य, संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार, प्रवक्ते व तमाम नेत्यांनी डॉ. सिंग यांना अखेरचा निरोप दिला.

हेही वाचा >>> काश्मिरात हिमवृष्टीने जनजीवन विस्कळीत;विमान रेल्वेसेवा ठप्प, जम्मूश्रीनगर महामार्ग बंद

डॉ. सिंग यांच्या निधनानंतर शुक्रवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी सिंग यांना श्रद्धांजली दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉ. सिंग यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव संमत केला. केंद्र सरकारने ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. सिंग २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे पंतप्रधान होते. सलग दोन वेळा पंतप्रधान झालेले व सर्वाधिक काळ या पदावर राहिलेले नेहरूंनंतरचे ते दुसरे काँग्रेस नेते होते. पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरही ते राज्यसभेचे सदस्य राहिले. एप्रिल २०२४ मध्ये ते वरिष्ठ सभागृहातून निवृत्त झाले.

निळी पगडी…

डॉ. सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याआधी त्यांची ओळख असलेली व आवडीची निळी पगडी त्यांना घालण्यात आली. डॉ. सिंग फक्त निळ्या रंगाची पगडी घालत असत. केब्रिज विद्यापीठातील त्यांच्या आठवणींचा भाग म्हणून डॉ. सिंग निळी पगडी घालत.

अन्य पक्षनेत्यांचीही आदरांजली

डॉ. सिंग यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अन्य पक्षांतील नेतेही आवर्जून काँग्रेसच्या मुख्यालयात आले होते. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते सुदीप बंदोपाध्याय तेसच, ‘आरएसपी’चे एन. के. प्रेमचंद्रन यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा निरोप

डॉ. सिंग यांचे पार्थिव मोतिलाल नेहरू मार्गावरील निवासस्थानातून अकबर रोडवरील काँग्रेसच्या मुख्यालयात सकाळी सव्वानऊच्या सुमारास आणले गेले. तिथे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले पी. चिदम्बरम, सलमान खुर्शीद, सुशीलकुमार शिंदे, मनीष तिवारी आदी ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या मागणीसाठी हे कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते. काँग्रेस मुख्यालयात जय्यत तयारी करण्यात आली होती. दोन्ही बाजूला मोठे फलक, काँग्रेसचे ध्वज लावण्यात आले होते. मोठ्या संख्येने होणारी कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेऊन मुख्यालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.