श्रीलंकेतील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. राजीनाम्यानंतर महिंद्रा राजपक्षे यांनी त्यांचं कोलंबोमधील अधिकृत निवास्थान सोडलं आहे. कोलंबोमधील अधिकृत निवासस्थान सोडल्यानंतर माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य तेथे असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मंगळवारी श्रीलंकेच्या त्रिंकोमाली नौदल तळासमोर निदर्शने सुरू झाली आहेत असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

   श्रीलंकेत अराजकतेचं वातावरण असताना श्रीलंकेत राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांशी दोन हात करत आहेत. श्रीलंकेत सोमवारी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांनी शांततापूर्ण सरकारविरोधी आंदोलकांवर हल्ला यानंतर आर्थिक आणि सामाजिक पातळीवर अनेक अडचणी निर्माण होऊन हिंसाचार सुरू झाला. यापुर्वी कोलंबो आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात २०० हून अधिक लोकं जखमी झाले होते.

श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, या घटनेनंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून देशात संचारबंदी लागू करण्यात आली. लष्कराला पाचारण करावं लागलं होतं.  डेली मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान टेंपल ट्रीज सोडल्यानंतर महिंदा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य तेथे असल्याच्या वृत्तानंतर त्रिंकोमाली नौदल तळासमोर आंदोलन सुरू झाले होते. व्हिडिओ फुटेजमध्ये महिंदा राजपक्षे आणि राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे हंबनटोटा शहरातील मेदामुलाना येथील संपूर्ण घर दिसत आहे.

Story img Loader