महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपनिश्चिती प्रकरणी आज ( २४ सप्टेंबर ) राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीस उपस्थित राहण्यापासून बृजभूषण सिंह यांना सूट देण्यात आली होती. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करण्याची एकही संधी बृजभूषण सिंह यांनी सोडली नाही, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळे ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

एका महिला कुस्तीपटूच्या तक्रारीचा संदर्भ देत दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितलं, “तजाकिस्तानमधील एका कार्यक्रमावेळी बृजभूषण यांनी तक्रारकर्त्या महिला कुस्तीपटूला खोलीत बोलावलं आणि जबदरस्तीनं तिला मिठी मारली. महिलेनं विरोध केल्यावर, वडिलांप्रमाणे ही मिठी मारल्याचं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं. बृजभूषण सिंह यांना आपण काय करतोय, याची माहिती होती.”

हेही वाचा : .. पोलीस ब्रिजभूषणला तेव्हाच रोखू शकले असते!

दुसऱ्या महिला कुस्तीपटूचा संदर्भ देत पोलिसांचे वकील म्हणाले, “तजाकिस्तानमध्ये आशिया चॅम्पियनशिपवेळी बृजभूषण सिंह यांनी परवानगीशिवाय महिला कुस्तीपटूचा शर्ट उचलला आणि अनुचितरित्या तिला स्पर्श केला होता.”

हेही वाचा : अन्वयार्थ: ना जनाची, ना मनाची..

दरम्यान, आज बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोप निश्चित प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली आहे. पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे. ‘एनडीटीव्ही’नं हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ex whi chief brij bhushan sharan singh missed no opportunity women wrestler sexual harassment delhi police in court ssa