देशात अनेक विकास प्रकल्प आले आणि या प्रकल्पांसोबतच स्थानिकांच्या विस्थापनाचा प्रश्नही उभा राहिला. अनेक प्रकल्पांमध्ये विस्थापित नागरिक आणि सरकारमध्ये संघर्ष पहायला मिळाला. कधी विस्थापितांनी मोबदला न मिळाल्याची तक्रार केली, तर कधी तुटपुंजा मोबदला दिल्याचा आरोप झाला. मात्र, विस्थापितांच्या लढ्यात नर्मदा बचाव आंदोलनाने यशस्वी संघर्ष करत सरकारच्या ६ लाख नुकसान भरपाईऐवजी ६० लाख नुकसान भरपाई मिळवली. याशिवाय घर, गाव, शाळा, आरोग्य केंद्र यांच्या विकासासाठीही यशस्वी लढा दिला. यामुळे देशभरातील विस्थापितांच्या लढ्याला बळ मिळाला. हे नेमकं हे कसं झालं? देशाच्या विस्थापनाच्या धोरणावर परिणाम करणाऱ्या या संघर्षाला यश कसं आलं? त्यांनी कोणकोणत्या मार्गाने लढा दिला? याचा आढावा घेणारा हा खास एपिसोड…
Exclusive Video: नर्मदा खोऱ्यातील विस्थापितांचा यशस्वी लढा, सरकारने दिलेला ६ लाखाचा मोबदला ६० लाख कसा झाला?
देशाच्या विस्थापनाच्या धोरणावर परिणाम करणाऱ्या या संघर्षाला यश कसं आलं? त्यांनी कोणकोणत्या मार्गाने लढा दिला? याचा आढावा घेणारा हा खास एपिसोड...
Written by प्रविण शिंदे
First published on: 06-05-2023 at 20:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exclusive video of goshta badalachi samajik parivartanachi narmada bachao andolan medha patkar pbs