नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर जीवसृष्टी होती हे दाखवणारे काही पुरावे दिले आहेत, पण वैज्ञानिकांच्या मते तेथील मातीच्या केवळ पहिल्या विश्लेषणातून तरी जीवसृष्टी होती असा अर्थ लगेचच काढणे चुकीचे ठरेल.
वैज्ञानिकांना रोव्हरच्या नमुना चाचणीत अनेक संयुगांचे अंश सापडले असून, त्यात कार्बनचाही समावेश आहे. तेथे सापडलेले कार्बनचे कण हे पृथ्वीवरून तेथे गेले, लघुग्रहावरून तेथे आले व ते मूळ मंगळावरचेच होते असे तीन पर्याय त्यात तपासावे लागणार आहेत. जर कार्बन हा मूळ तेथील असेल तर तिथे भूगर्भशास्त्रीय व जैविक क्रिया घडत होत्या असे मानण्यास जागा आहे असे ‘डिस्कव्हरी न्यूज’ने म्हटले आहे.
सॅनफ्रान्सिस्को येथील अमेरिकन जिओफिजिकल युनियन कॉन्फरन्समध्ये मंगळ मोहिमेतील एक प्रमुख वैज्ञानिक जॉन ग्रोटिंगर यांनी सांगितले, की सध्यातरी कार्बनचे कण कुठून आले हे सध्यातरी सांगता येणार नाही. कुठेतरी कार्बनचे कण सापडणे म्हणजे तिथे जीवसृष्टी होती असे म्हणता येणार नाही.
कुठेही जीवसृष्टी असेल तर त्यासाठी पाणी, ऊर्जास्रोत, कार्बन हे मूलभूत घटक असणे गरजेचे असते. गंधक, ऑक्सिजन, फॉस्फरस व नायट्रोजन हे घटकही महत्त्वाचे ठरतात. क्युरिऑसिटी या रोव्हर गाडीने आताच असे दाखवून दिले आहे, की जिथे ही गाडी उतरली आहे त्या गेल विवरात पूर्वी
पाणी होते. माती विश्लेषणातही पाण्याशी खनिजांची रासायनिक अभिक्रिया झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गाडीवर रासायनिक प्रयोगशाळा असल्याने तेथे सूक्ष्म जीवांचे अस्तित्व होते की नाही याची शहानिशा करणे शक्य होणार आहे. तेथील रासायनिक प्रयोगशाळेला अद्याप ऑक्सिजन क्लोरिन यांची संयुगे सापडली असून त्यात पेरक्लोरेटचाही समावेश आहे.
पॉल महाफी यांनी सांगितले, की तेथील दाणेदार वाळूत कार्बनी संयुगे नाहीत असे म्हणता येणार नाही. येथे काही साधी संयुगे सापडत आहेत. येथील कार्बन कुठून आला याचे कोडे सोडवावे लागणार आहे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा