नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू व काश्मीरमध्ये मतदारांनी ‘इंडिया’ महाआघाडीला कौल दिला असल्याचे मतदानोत्तर चाचण्यांमधून दिसून आले. दोन्ही विधानसभांसाठी मतमोजणी मंगळवारी, ८ ऑक्टोबरला होणार आहे. दोन्हीकडे सदस्य संख्या ९० इतकी असून बहुमतासाठी ४६ जागा आवश्यक आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हरियाणातील मतदान संध्याकाळी सहा वाजता संपल्यानंतर विविध माध्यमे आणि वृत्तवाहिन्या मतदानोत्तर चाचण्यांचा निकाल जाहीर केला. त्यापैकी हरियाणामध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दैनिक भास्करचा अपवाद वगळता जवळपास सर्वच चाचण्यांमध्ये काँग्रेसला ५०पेक्षा जास्त जागा मिळतील असे दिसत आहे. तर, भारतीय राष्ट्रीय लोकदलाला जननायक जनता पक्षापेक्षा जास्त जागा मिळतील असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>> तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा! भाविकांकडून प्रशंसा : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा
तब्बल १० वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होत असलेल्या जम्मू व काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता दिसत आहे. असे असले तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेसच्या आघाडीला भाजपपेक्षा जास्त जागा मिळतील असाच सर्व मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज आहे. इंडिया आघाडीच्या या घटक पक्षांमध्ये एनसी काँग्रेसपेक्षा आघाडीवर असेल असेही दिसून येत आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) ५ ते १२ मतदारसंघांमध्ये विजयी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर अपक्षांसह इतरांना ४ ते १६ जागा मिळतील असे या चाचण्यांमधून दिसत आहे.
‘अॅक्सिस माय इंडिया’चे प्रदीप गुप्ता नवीन संस्थेबरोबर
निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांची ‘अॅक्सिस माय इंडिया’ ही संस्था गेल्या नऊ वर्षांपासून ‘इंडिया टुडे’ समूहाबरोबर काम करत होती. मात्र, जम्मू व काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज वर्तवण्यासाठी ‘अॅक्सिस माय इंडिया’ने ‘रेड माइक’ या संस्थेबरोबर यूट्यूबवर मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल आणि विश्लेषणात सहभाग घेतला.
हरियाणा (९०)
संस्था भाजप काँग्रेस
दैनिक भास्कर १५–२९ ४४–४५
रिपब्लिक मॅट्रिझ १८–२४ ५५–६२
रेड माइकडेटांश २०-२५ ५०-५५
ध्रुव रिसर्च २२-३२ ५०६४
पीपल्स पल्स २०–३२ ४९–६०
जम्मू व काश्मीर (९०)
संस्था भाजप एनसी -काँग्रेस
सीव्होटर २७-३२ ४०-४८
दै. भास्कर २०-२५ ३५-४०
पीपल्स पल्स २३-२७ ४६-५०
रिपब्लिकन २८-३० ३१-३६
अॅक्सिस २४-३४ ३५-४५