तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या तीन राज्यांच्या विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया सोमवारी संपुष्टात आली. येत्या १९ तारखेला या तीन राज्यांसह पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांतील निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आजची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अपेक्षेप्रमाणे विविध सर्वेक्षण संस्थांद्वारे या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या कलमापन चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. या निष्कर्षांनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार असून तामिळनाडूत जयललिता व आसाममध्ये तरूण गोगोई यांना सत्तेची सूत्रे गमवावी लागणार असल्याचे दिसत आहे.
‘एबीपी आनंदा’च्या सर्वेक्षणानुसार या निवडणुकांमध्ये तृणमुल काँग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ काहीसे घटणार असले तरी त्यांना २९४ पैकी १७८ जागा मिळतील. तर, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला ११० जागा मिळतील. मात्र, भाजपला अवघी एक जागा मिळणार असून अन्य पक्षांना पाच जागा मिळतील असा कयास या सर्वेक्षणात वर्तविण्यात आला आहे.
Exit polls: पश्चिम बंगालमध्ये ममतांची सत्ता अबाधित; जयललिता, गोगोईंचा पराभव
निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या कलमापन चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत.
Written by एक्सप्रेस वृत्तसेवा
Updated:

Create column charts
Create bar charts
Create column charts
Create column charts
First published on: 16-05-2016 at 19:57 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exit polls tarun gogoi projected to lose assam mamata to return in bengal