आज संपूर्ण जग विस्तारवादी ताकदींमुळं वैतागला आहे. ही विस्तारवादी वृत्ती एक प्रकारे मानसिक विकृती असून ती १८व्या शतकातील विचार दर्शवते. भारत या विचारांच्याविरोधात प्रखर आवाज बनल आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता चीनच्या भूमिकेवर सडकून टीका केली. जैसलमेर येथे सीमेवरील जवानांसोबत मोदी आज दिवाळी साजरी करीत आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवानांना आणि देशवासियांना संबोधित केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोदी म्हणाले, “आज जगाला हे कळतंय की भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळं टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आज भारत जागतीक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे.”

“आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेलं असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की, सतर्कता हाच आपली सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्यचं विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे,” अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

मोदी पुढे म्हणाले, जागाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की, केवळ तिचं राष्ट्रे सुरक्षित असतात आणि पुढे जातात ज्यांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीशी मुकाबला करण्याची क्षमता असते. जगातील कोणतीच ताकद आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Expansionism is a mental disorder modi criticizes chinas role aau